कानपूर- शहरातील बाबूपुरवा लोको कॉलनीतील एका घरावर बुधवारी दुपारी एका ट्रेनिंग इंस्टिट्यूटचे ग्लाइडर प्लेन कोसळले. या दुर्घटनेत एक प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक जखमी झाली आहे.
एनसीसीची प्रशिक्षक महिला वैमानिक गुरमीत (30) ही टू सीटर सिंगल इंजिन रोटल ब्लेड प्लेन 'सिगना 152' विमान उडवत होती. चकेरीकडून विमान येत असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारात लोको कॉलनीतील एका घराच्या छतावर ते कोसळले. स्थानिक नागरिकांनी विमानात अडकलेल्या महिला वैमानिकाला बाहेर काढले. जखमी अवस्थेत महिलेला एअरफोर्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैमानिकाच्या डावा हाताला मोठी दुखापत झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
चौकशी होणार...
तीन वाजेपासून प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक एटीसीच्या संपर्कात होती. परंतु तीन वाजून पाच मिनिटांनी विमानाचा एटीसीशी संपर्क तुटल्याचे चकेरी एअरपोर्टचे संचालक आर.के.कुशवाहा यांनी सांगितले. कुशवाहा यांच्या मते, जोपर्यंत एटीसी सिगनल देत नाही तोपर्यंत वैमानिकाला विमान हवेत उडवावे लागते. एटीसी आणि दुर्घटनाग्रस्त विमानाचा संपर्क कसा तुटला याबाबत चौकशी केली जाईल असे कुशवाहा यांनी सांगितले आहे.
ग्लाइडर प्लेन पाहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी खूप गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी मोठी अडचणीचा सामना करावा लागला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, दुर्घटनाग्रस्त ग्लाइडर प्लेनची छायाचित्रे...
(फोटो: दुर्घटनाग्रस्त ग्लाइडर प्लेन)