आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडात महाप्रलय: राज्‍यातील यात्रेकरुंना विशेष विमानाने परत आणणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/मुंबई- उत्तराखंडमध्‍ये अडकलेल्‍या महाराष्‍ट्रातील यात्रेकरुंना परत आणण्‍यासाठी राज्‍य सरकारने पावले उचलली आहेत. यात्रेकरुंना परत आणण्‍याची व्‍यवस्‍था राज्‍य सरकार करणार असून त्‍यांच्‍या मदतीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. दिल्‍लीहून विशेष विमानाने यात्रेकरुंना परत आणण्‍यात येणार आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत निर्णय घेण्‍यात आला. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सो‍निया गांधी उत्तराखंड येथील जलप्रलयाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करणार आहेत.

प्राप्‍त माहितीनुसार, राज्‍यातील 1353 यात्रेकरु उत्तराखंडमध्‍ये अडकले आहेत. त्‍याशिवाय 9 महिलांचा मृत्‍यू झाल्‍याचीही माहिती आहे. त्यात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका महिलेचा समावेश आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्‍याचा प्रयत्‍न राज्‍य सरकारकडून सुरु आहेत. सुमारे 334 यात्रेकरुंचा संपर्क तुटला आहे. तर 1019 जण सुरक्षित असल्‍याचीही माहिती आहे.

नाथ वाचले, केदारधाम उद्ध्‍वस्‍त...
'देवभूमी' उत्तराखंडमधील महाप्रलयाचा जबरदस्त फटका केदारनाथला बसला आहे. भूस्खलन झाल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथाचे मुख्य मंदिर गाळ आणि ढिगार्‍यात तेवढे उभे आहे. प्रवेशद्वारासह परिसरातील 40 हॉटेल आणि सुमारे दीडशे दुकाने गाळात रुतली आहेत. खचलेले रस्ते आणि कोसळलेल्या दरडींमुळे हजारावर लोकांचा ठावठिकाणा नाही. खेचरावर प्रवाशांना वाहून नेणारे 700 लोकही बेपत्ता आहेत. प्रशासनाने 200 लोक मृत्युमुखी, तर 500 बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. सध्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यावरच भर आहे. अनेक राज्यांत पाऊस, महापूर असून, दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाने भारतीय सैन्यातील पाच जवानांचा बळी घेतला आहे. तीन जवान आयटीबीपीचे तर दोन जण स्थानिक पोलिस कर्मचारी होते. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील बहेतक रस्ते ढगफुटीमुळे उद्‍ध्वस्त झाले आहे. त्यामुळे सुमारे 75 हजार पर्यटक उडकले आहेत. वाहतूक ठप्प झाल्यामुळे बचाव कार्यात एक ना अनेक अडचणी येत आहेत. बचाव कार्यात आयटीबीपीचे 50 जवान आणि अनेक शासकीय अधिकारी बेपत्ता झाल्याचे रुद्रप्रयागचे डीएमच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तराखंडमध्ये महाराष्‍ट्रातून गेलेले यात्रेकरू सुखरुप असल्याचे महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

आतापर्यंतचे बचावकार्य
>हरसिलमध्ये पूल उभारून जवानांनी 600 नागरिकांना बाहेर काढले.
>लष्कराच्या एका तुकडीला बदासूमध्ये हेलिकॉप्टरने उतरवण्यात आले.
>हरसिल गंगोत्रीत एक स्वतंत्र रस्ता तयार करून 100 नागरिकांना वाचवले.
>गेल्या चोवीस तासांत हवाई दलाने 15 मुलांसह 60 जणांना वाचवले.
>नरेंद्रनगर ते धारसूपर्यंत दहा ठिकाणी रस्ता बंद. लष्कर मदतीला.

उत्तर भारतात पावसाचा कहर.. वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये