आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - भारतासारख्या काही देशांची खड्ड्यांतून सुटका होत नसताना इंग्लंडमध्ये मात्र रस्ते रात्रीच्या वेळी खर्या अर्थाने चकाकणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यासाठी जलप्रतिबंधक स्प्रे तयार करण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
रस्त्यावर स्प्रेच्या साह्याने कोटिंग केल्यानंतर एक प्रकारचा प्रकाशदेखील पडणार आहे. त्यामुळे पथदिव्यांचा खर्च काही प्रमाणात का होईना वाचू शकेल. केम्ब्रिजमधील ख्राइस्ट्स पिसेस उद्यानात या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जात आहे. डांबर किंवा सिमेंटच्या रस्त्यांवर हे कोटिंग उत्तमरीत्या काम करू शकते. ब्रिटनचे अंतर्गत रस्ते सिमेंटचे आहेत. त्यावर कोटिंगचा उपयोग होऊ शकतो. पथदिव्यांसाठी हा पर्याय महागडा ठरू शकतो, असा अंदाज मांडण्यात आला आहे.
कोटिंगला स्टारपाथ असे म्हटले जाते. वातावरणातील प्रकाश साठवण्याची प्रक्रिया स्टारपाथमध्ये घडून येते, अशी माहिती प्रो-टेक सेल्सचे संचालक नील ब्लॅकमोर यांनी दिली.
नेमके कसे आहे तंत्रज्ञान ?
स्प्रेच्या कोटिंगमध्ये प्रकाश शोषून ती साठवण्याची क्षमता आहे. दिवसभर यूव्ही लाइट शोषून त्याचे रात्रीच्या वेळी उत्सर्जन करण्याचे हे विशिष्ट तंत्र संशोधकांनी त्यासाठी वापरले आहे. कोटमधील कण नैसर्गिक प्रकाश उपलब्ध करून घेण्याचे काम करतात.
कोणी केले विकसित ?
ब्रिटनमधील कंपनी प्रो-टेकने या तंत्रज्ञानासाठी वापरण्यात आलेल्या विशिष्ट प्रकारच्या कोटिंगची निर्मिती केली आहे. कोटिंग हाच या तंत्रज्ञानातील महत्त्वाचा घटक आहे. ब्रिटनच्या रस्त्यावर सर्वाधिक धोका सायकल आणि पादचारी यांच्यातील अपघाताचा मानला जातो. हे कोटिंग त्यावरदेखील मात करणारे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.