आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचे उत्तर...मोदी प्रदेश, विजयानंतर अमित शहांसोबत कार्यकर्त्यांनी फुलांची होळी खेळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा जनतेने मोदींना आणि मोदींनी देशाला चकित केले. ५ पैकी २ राज्यांत ऐतिहासिक बहुमत आणि मणिपूरमध्ये प्रथमच बहुमतापर्यंत पोहोचून देशात अजूनही मोदी लाट आहे हे स्पष्ट केले.
 
उत्तर प्रदेशात जो विजय मिळाला तसा तर १९९१ च्या राम लाटेत (तेव्हा २२१ जागा) आणि १९८० च्या इंदिरा लाटेतही (काँग्रेसला ३०९ जागा) मिळाल्या नव्हत्या. भाजप व आघाडीला उत्तर प्रदेशात ३२४ जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त पंजाबमध्ये आनंद साजरा करता आला.
 
सर्वात आश्चर्यकारक बातमी
- भाजपत आलेले इतर पक्षांचे ८५% पेक्षा जास्त बंडखोर विजयी. असे प्रथमच घडले.  
- मायांच्या गडातील दलितबहुल ६७, अखिलेशच्या यादवबहुल ५२ जागा भाजपला.  
- स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरही नव्हता अशा ६७ जागांवर भाजपचा विजय.  
- भाजपत घराणेशाहीला यश. १२ नेत्यांच्या नातेवाइकांना तिकिटे मिळाली होती, १० विजयी.   
 
मुलायमांची सून, बलात्काराचा आरोपी गायत्रीही पराभूत
- बंडखोर - बलात्काराचा आरोपी गायत्री व मुख्तार अन्सारी, अतिक अहमद, अजय राय हे गुंड पराभूत. पण राजाभय्या विजयी.  
- घराणेशाही - मुलायमांची सून, लालूंचा जावई हरले. राजनाथ, लालजींची मुले विजयी.  
- बालेकिल्ल्यात - भाजप वाराणसीत सर्व ८ जागी विजयी. अमेठी-रायबरेलीत भाजपला ३-३ जागा. ५ वर्षांनी अयोध्येत पुन्हा कमळ. 
- पक्ष बदलणारे - उप्रत सपच्या अंबिका बसपत येऊन पराभूत. काँग्रेसच्या रिता बहुगुणा भाजपत येऊन, उत्तराखंडात काँग्रेस सोडून आलेले १४ नेते जिंकले. पंजाबात सिद्धू विजयी.
 
पराभवाने आश्चर्याचा धक्का  
 उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत हरिद्वार, किच्छा दोन्ही जागांवर पराभूत. पंजाबमध्ये अमरिंदरसिंह ‘लांबी’तून प्रकाशसिंग बादलकडून पराभूत.
 
गोव्यात भाजपला १७ वर्षे जुना कल मोडण्यात अपयश, त्रिशंकूची शक्यता  
भाजपला सलग दुसऱ्यांदा गोव्यात बहुमत मिळू शकले नाही. २००० नंतर गोव्यात प्रथमच एखाद्या पक्षाला सलग दुसऱ्यांदा संधी. तेथे पर्रीकरांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
 
मणिपूरमध्ये भाजपची २५०% वाढ  
मणिपूरमध्ये भाजपने २१ जागा जिंकल्या. त्याआधी त्यांच्याकडे २००६ मध्ये ६ जागा होत्या. म्हणजे १७ वर्षांत २५०% वाढ. उपोषणामुळे चर्चित इरोम शर्मिलांना फक्त ९० मते मिळाली.  
 
केजरी...पंजाब-गोव्यात अपयशी  
पंजाबमध्ये १०० जागा आणि गोव्यात पूर्ण बहुमताचा केजरीवाल यांचा दावा होता. पण पंजाबमध्ये तो मुश्किलीने दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचला. गोव्यात तर खातेही उघडले नाही. आता त्याचा परिणाम पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली मनपा निवडणुकीवरही दिसू शकतो. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, उ. प्र. त मुस्लिमबहुल १२४ जागा, भाजपने ९९ जिंकल्या...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...