आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा: भाजप उपाध्यक्षासह पत्नी, मुलावर हूंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- भाजपचे उपाध्यक्ष आणि उद्योजक अनिल होबळे यांच्या विरोधात सुनेचा हूंड्यासाठी छळ आणि पिळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. होबळे यांची पत्नी संध्या आणि मुलगा मिलिंद यांच्या विरोधात कलम 498A, 323, 506(2) तसेच आयपीसीच्या कलम 34मधील 3 आणि 4 या हुंडाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
दरम्यान, पाटो-रायबंदर येथील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटशी निगडित बेकायदा बांधकाम मोडण्याचा आदेश देण्याबरोबरच या रेस्टॉरंटचे मालक अनिल होबळे यांच्याकडून 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला होता. मात्र, लवादाने 20 लाखांच्या वसुलीस स्थगिती दिली होती. तसेच त्या जागेत आणखी बेकायदा बांधकाम असल्यास लवादाचा पुढील निवाडा होईपर्यंत ते जैसे थे स्थितीत ठेवले जावे, असा आदेश लवादाने दिला होता.
बातम्या आणखी आहेत...