आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रीकर होम पिचवर बोलणार? सर्जिकल स्ट्राइकनंतर प्रथमच गोव्यामध्ये जाहीर सत्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी -संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय आरोप झाले होते. पीआेकेतील सर्जिकल स्ट्राइकनंतर ते पहिल्यांदाच गोव्यात येणार आहेत. ४ ऑक्टोबर रोजी त्यांची जाहीर सभा होणार असून त्या सभेत आपल्या विरोधकांना काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संरक्षणमंत्री पदापेक्षा विधानसभा निवडणुकीत अधिक लक्ष घालतात, असा आरोप पर्रीकर यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने होत होता. मंगळवारी ऐतिहासिक आझाद मैदानावर त्यांचा यशस्वी लष्करी मोहिमेबद्दल गौरव केला जाणार आहे. त्या निमित्ताने ते सुमारे १० हजारांहून अधिक नागरिकांना संबोधित करणार आहेत, अशी माहिती प्रदेश भाजपचे अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. सर्जिकल स्ट्राइकनंतरचे पर्रीकर यांचे हे पहिलेच सार्वजनिक भाषण असणार आहे. या निमित्ताने ते आपल्या भावना व्यक्त करतील. कार्यक्रमाच्या आयोजनाचा आम्हाला अभिमान वाटतो, असे तेंडुलकर यांनी सांगितले. भारताने व्याप्त काश्मीरमध्ये विशेष कमांडो पथक घुसवून दहशतवाद्यांच्या सात तळांना नेस्तनाबूत केले होते. त्यात ४० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

स्वच्छतागृहासाठी आग्रह : संपूर्ण स्वच्छतागृहासाठी आग्रही असलेल्या राज्यात गोव्याचा पहिला क्रमांक लागेल. तशी तयारी केली जात आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर उघड्यावरील शौचाला बंदी आणणारे देशातील पहिले राज्य ठरेल, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोवा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे गोव्याच्या स्वच्छतेला आमचे प्राधान्य आहे.
बातम्या आणखी आहेत...