आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Eighth Annual BRICS Summit In Goa: PM Modi Meets Russia President Vladimir Putin

#BRICS पूर्वी भारत-रशियामध्ये मोठे करार, आर्मीला मिळणार अँटी मिसाईल डिफेंस सिस्टिम, 200 हेलिकॉप्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी : #BRICS2016 ची सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीत दहशतवाद, डिफेन्स, अणुकरारासहित एकूण 16 करार झाले. 40 हजार कोटी रुपयांचा सुरक्षा करार करण्यात आला. रशियाकडून भारताला एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम आणि 200 कामोव हेलिकॉप्टर मिळणार आहेत. यामधील 40 रशियातून येणार आणि इतर 160 'मेक इन इंडिया' अंतर्गत भारतातच तयार होणार. दोन्ही देशांमध्ये ऍडमिरल ग्रिगोरोविच क्लासच्या स्टील फ्रिगेट(लढाऊ जहाज) संदर्भात करार झाला आहे. भारतीय नौदलाला हे फ्रिगेट आणखी बलशाली करतील.

करार झाल्यानंतर काय म्हणाले मोदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेची सुरवात आणि शेवट रशियन भाषेत केला.
- मोदी म्हणाले की, "एक रशियन म्हण आहे की, 1 जुना मित्र नवीन 2 मित्रांपेक्षा चांगला असतो. रशियासोबत आपली ऐतिहासिक मैत्री राहिली आहे."
- "रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि मी दोघांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली. दोघांंमधील चर्चा सकारात्मक राहिली. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपवर रशियाने विश्वास दर्शवला आहे, रशिया भारताला कामोव हेलिकॉप्टर देणार."
- मोदींनी पुढे सांगितले की, 'सिव्हिल न्यूक्लिअर पॉवर (कुडनकुलम- 2, 3, 4)साठी रशियासोबत करार करण्यात आले आहेत. आम्ही सायन्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये सोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेंड आणि इनव्हेसमेंट संदर्भातही दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत.
- दोन्ही देशांमध्ये प्रत्येक वर्षी मिल्ट्री इंडस्ट्रियल कॉन्फरन्स होईल. दोन्ही देशांमध्ये 16 करारांवर स्वाक्षरी झाली असल्याचे विकास स्वरूप यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...