आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लमाणींच्या सुरक्षिततेबाबत निश्चिंत रहा, गोव्याचे सीएम पर्रीकर यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्रीकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवून राज्यातील लमाणी जमातीच्या लोकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता न करण्याची खात्री दिली आहे. (फाईल) - Divya Marathi
पर्रीकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवून राज्यातील लमाणी जमातीच्या लोकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता न करण्याची खात्री दिली आहे. (फाईल)
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवून राज्यातील लमाणी जमातीच्या लोकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता न करण्याची खात्री दिली आहे. आपल्याला नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारीचे भान आहे. त्यामुळे, राज्यात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या सुरक्षेबाबत आपण निश्चिंत राहा, असेही त्यांनी सिद्धरामय्या यांना आश्वस्त केले आहे.
 
गोव्यातील मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वाद
गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांनी राज्यातील किनाऱ्यांवरील लमाणींना हटवण्यात येईल, असे वक्तव्य केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच या समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला होता. लमाणी समाजाने पत्रकार परिषदेतून पर्यटन मंत्र्यांना माफी मागण्याची विनंती केली होती. लमाणी जमातीत अनेकजण सुशिक्षित लोक आहेत. या जमातीच्या लोकांची हकालपट्टी करू, या वक्तव्यामुळे या जमातीचा अपमान झाल्याचा दावा त्यांनी केला होता. 
 
पत्रात पर्रिकर म्हणाले...
लमाणी जमातीच्या लोकांचे कर्नाटकात मोठे प्रमाण आहे. बाबू आजगांवकर यांच्या वक्तव्याची खुद्द कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दखल घेऊन मुख्यमंत्री पर्रीकर यांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी लमाणींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली होती. 
'वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असू शकतात हे आपल्याला पूर्वअनुभवावरून चांगलेच माहित असेल. यामुळे अशा वृत्तांकडे पूर्णपणे सत्य परिस्थितीची खातरजमा करूनच पाहावे' , असा सल्ला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्राव्दारे दिला.
 
गोव्यात सर्व प्रकारचे लोक आपले वेगळेपण जपूनही शांततेने राहतात. लमाणी जमातीच्या लोकांचेही राज्यात अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. ते मोठ्या सन्मानाने आणि प्रतिष्ठेने राहतात. इथला प्रत्येक नागरीक हा पहिला भारतीय आणि नंतर गोमंतकीय आहे. इथल्या प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकारची आहे त्यामुळे प्रत्येकाची सुरक्षा आणि राज्यातील शांतता अबाधित राहील, याची चिंता आपण करू नका,असेही पर्रीकर यांनी सिद्धरामय्या यांना कळवले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...