आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटीश मुलगी स्कार्लेट मर्डर आणि रेप खटल्यात 8 वर्षानंतर निर्णय, दोन्ही आरोपी निर्दोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कार्लेट तिच्या कुटुंबासह 2008 मध्ये सहा महिन्यांसाठी भारत भ्रमंतीवर आली होती. - Divya Marathi
स्कार्लेट तिच्या कुटुंबासह 2008 मध्ये सहा महिन्यांसाठी भारत भ्रमंतीवर आली होती.
पणजी - ब्रिटीश मुलगी स्कार्लेट अॅडन किलींग रेप आणि मर्डर केसमध्ये 8 वर्षानंतर आलेल्या निर्णयात स्थानिक कोर्टाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 15 वर्षांच्या स्कार्लेटचा खून 19 फेब्रुवारी 2008 मध्ये झाला होता. तिचा मृतदेह येथील अर्धनग्न अवस्थेत अंजूना बीचवर सापडला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास गोवा पोलिसांनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते. स्कार्लेटच्या आईने या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. स्कार्लेट तिच्या कुटुंबासह 2008 मध्ये सहा महिन्यांसाठी भारत भ्रमंतीवर आली होती.

काय आहे प्रकरण
- गोवा येथील प्रसिद्ध अंजूना बीचवर स्कार्लेटचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता.
- या प्रकरणात सॅम्सन डिसोझा आणि प्लॅसिदो कार्व्हेलो यांच्यावर रेप आणि हत्येचा आरोप होता. हे दोघेही बीचवर काम करत होते.
- गोवा पोलिसांनी प्राथमिक तपासात स्कार्लेटचा मृत्यू समुद्रात बुडाल्याने झाल्याचे म्हटले होते. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.
योना यांनी पुन्हा पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली होती. दुसऱ्या पोस्टमॉर्टममध्ये बलात्कारानंतर हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते.
- सीबीआयने या प्रकरणी 2010 मध्ये चार्जशीट फाइल केली होती.

सुनावणी दरम्यान पाच न्यायाधीश बदलले
- या प्रकरणाची सुनावणी आठ वर्षे चालली.
- या दरम्यान तीन सरकारी वकील आणि पाच न्यायाधीश बदलले.
- प्रकरणातील महत्त्वाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ब्रिटीश सिटीझन मायकल मानियन यांची साक्ष नोंदवली गेली नाही.
- मायकल यांनी त्यांच्या जबाबात म्हटले होते की सॅम्सन आणि प्लॅसिदो यापैकी एकाला स्कार्लेटसोबत लैंगिक अत्याचार करताना पाहिले होते.
पुढील स्लाइडमध्ये, निर्णयावर स्कार्लेटची आई नाराज
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...