आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यातील \'फॅबइंडिया\'च्या ट्रायल रुममध्ये मॅनेजरनेच लावला होता छुपा कॅमेरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: गोव्यातील फॅबइंडिया स्टोअर)
पणजी- गोव्यातील फॅबइंडिया स्टोअरच्या ट्रायल रूममध्ये मॅनेजरनेच छुपा कॅमेरा लावला होता, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी स्टोअर मॅनेजर चित्राली सावंतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, चित्राली सावंत अद्याप मोकाटच आहे. चित्रालीचे सध्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीच कंडोळीमधील फॅबइंडिया स्टोअरच्या ट्रायल रुमध्ये लावलेला छुपा कॅमेरा पकडला होता. याप्रकरणी स्टोअरमधील चार कर्मचार्‍यांना पोलिसांनी अटक केले होते.

गोवा पोलिसांनी फॅबइंडियाचे स्टोअर सील केले आहे. दुसरीकडे, या प्रकरणी अटक केलेल्या 4 आरोपींना शनिवारी गोव्यातील एका कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने पाच हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर सूटका केली आहे. मात्र, चौकशी सुरू असे पर्यंत गोव्यातच राहाण्याचे निर्देश दिले आहेत.

गुन्हे शाखाचे एस.यू. शिरोडकर यांनी संगितले की, 'फॅबइंडियाच्या स्टोअरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कॅमेरे बसवल्याचे आढळले आहे. या कॅमेर्‍यातून महिलांचे फुटेज रेकॉर्ड केले जात होते. ट्रायल रुमध्ये कपडे बदलणार्‍या महिलांचा व्हिडिओ बनवण्यासाठी मॅनेजर चि‍त्राली आणि स्टोअरमध्ये काम करणार्‍या काही कर्मचार्‍यांनी हे कॅमेरे बसवले होते.

'फॅबइंडिया'ने म्हटले छुपे कॅमेरे नव्हते...
गोव्यातील स्टोअरच्या ट्रायल रूमसह कुठेही छुपे कॅमेरे बसवले नसल्याचे 'फॅबइंडिया'ने म्हटले आहे. तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना झालेल्या असुविधेबद्दल फॅबइंडियाने माफी मागितली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक पाहा, स्मृती इराणी यांच्या खुलास्यावर मीनाक्षी लेखींनी विचारला सवाल...