आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल वर्ल्डकपसाठी सहा आमदारांनी सरकारी खजिन्यातून उडवले 89 लाख !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - फिफा विश्वचषक याची 'याची देही याची डोळा' पाहाण्याचा मोह गोव्याच्या तीन मंत्री आणि तीन आमदारांना झाला आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या खजिन्यातील तब्बल 89 लाख रुपये खर्च केल्याचे एका इंग्रजी दैनिकातील वृत्तात म्हटले आहे.
आजपासून ब्राझीलमध्ये फिफा विश्वचषक सुरु होत आहे. फुटबॉलचा हा महासंग्राम पाहाण्यासाठी गोव्याचे सहा आमदार जाणार असल्याचे कळते. मात्र, ते खासगी टूरवर जात नसून चक्क राज्य सरकारचा निधी त्यासाठी वापरला जाणार आहे. यात राज्याचे क्रीडा मंत्री रमेश तावेडकर देखील आहेत. विश्वचषक पाहाण्यासाठी राज्याच्या खजिन्यातील लाखो रुपयांची उधळ होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यावर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, ब्राझील दौ-यावर जात असलेल्या शिष्टमंडळात एकही क्रीडा तज्ज्ञ नाही किंवा स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडायाचा एकही सदस्य नाही. इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार तीन मंत्री आणि तीन आमदार या दौ-यावर जात आहेत. यात राज्याचे क्रीडा मंत्री तावेडकर, मत्स्यपालन मंत्री अवेरटेनो फुर्टाडो, ऊर्जा मंत्री मिलिंद नाईक आणि तीन आमदार आहेत. क्रीडा मंत्री तावेडकर यांचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.