आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यातील मंत्र्यांचे जिवाचे ‘ब्राझील’; खेळाडूंना डावलले, मंत्री, आमदारांना पाठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे खासदार, मंत्री व नेत्यांना शिस्त लावण्यासाठी नित्य नवे आदेश जारी करत आहेत. सरकारी खर्च टाळण्यासाठी ते प्रयत्न करत असताना त्यांच्याच पक्षाचे सरकार असलेल्या गोव्यात चार मंत्र्यांना मात्र फुटबॉलचे उपउपांत्य आणि उपांत्यफेरीचे सामने पाहण्यासाठी सरकारी तिजोरीतून ब्राझीलची वारी घडवण्याचा घाट घालण्यात आला आहे.

गोव्यातील खेळाडूंऐवजी चार मंत्री व तीन आमदारांना ‘जिवाचे ब्राझील’ करण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या दौर्‍यावर सरकारी तिजोरीतून 89 लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
ब्राझीलला जाऊन फुटबॉल सामने पाहण्याची संधी मिळालेल्यांत क्रीडामंत्री रमेश तावडकर, मत्स्य पालनमंत्री एवर्तानो फुताडरे, ऊर्जामंत्री मिलिंद नाईक, वास्कोचे आमदार कालरेस एलमिडा, वेलिमचे आमदार बेंजामिन सिल्वा, अल्डोनाचे आमदार ग्लेन टिकलो यांचा समावेश आहे. गोव्यातील अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू ब्रह्मानंद शंखवालकर व ब्रुनो कोटिन्हो यांनी ब्राझीलला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी मंत्री, आमदारांनाच पाठवण्यामध्ये स्वारस्य दाखवले.