आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात 12 जूनपूर्वीच पंचायत निवडणुका; मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्यात पंचायत निवडणुका 12 जूनपूर्वीच घेण्यात याव्यात असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी राज्य सरकारला 21 मे रोजी निवडणूक घेण्याची शिफारस केली होती. सरकारने मात्र, 25 जून रोजी निवडणूक घेण्यात यावी, असे आयोगाला सांगितले होते. या तारखेला विरोधीपक्ष कांग्रेससह इतर पक्षांनीही विरोध केला होता.
 
राज्यात सांजाव उत्सव याच काऴात साजरा होतो. निवडणूक आचारसंहिता आणि मतदानाच्या दिवशी असलेला ड्राय डे... यामुऴे सांजाव ड्राय पडेल म्हणून अनेक ख्रिस्ती नेत्यांनी तारखांवर आक्षेप घेतला होता. या विरोधाची दखल घेत पंचायत मंत्री माविन गुदीन्हो यांनी ही तारीख बदलून 17 जून रोजी निवडणुका घेण्याचे निश्चित केले होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने आपली 21 जूनची तारीखच उचित होती अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारची कोंडी झाली होती. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूका आणि प्रदीर्घ आचारसंहिता काळाने हा विलंब होत आहे, असे सरकारचे म्हणणे होते. 
 
निवडणूक आयोगाला सुनावले
घटनेनुसार निवडणूका वेळेत घेणे ही आयोगाची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यात आयोग कमी पडला, अशी कानउघडणी खंडपीठाने केली. अखेर 12 जून 2017 पूर्वी निवडणूक घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. राज्यातील 191 पैकी 186 पंचायतींचा कार्यकाऴ 27 मे 2017 रोजी संपूष्टात येत आहे.  पंचायत निवडणूका वेऴेत व्हाव्यात म्हणून रोहन शिरोडकर यांनी ही जनहीत याचिका दाखल केली होती.
 
सांजाव उत्सव
सांजाव हा उत्सव दरवर्षि गोव्यातील ख्रिस्ती बांधव 24 जून रोजी साजरा करतात. या दिवशी पावसात तुडंूब भरलेल्या विहीरी,तलांव,नद्यांत उड्या टाकून साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांचा एक धार्मिक उत्सव म्हणूनही या उत्सवाला महत्व आहे.
 
बातम्या आणखी आहेत...