आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goa Minister Says Narendra Modi Will Make India A Hindu Rashtra

भारत पूर्वीपासूनच हिंदू राष्ट्र, गोव्याचे उपमुख्यमंत्री डिसुझांचे वादग्रस्त वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्याचे मंत्री दीपक धवळीकरांच्या वक्तव्यानंतर आज गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांनीही एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डिसूझा म्हणाले की, "भारत पूर्वीपासूनच हिंदू राष्ट्र होते आणि नेहमीच राहिल. तुम्हाला वेगळ्याने हिंदू राष्ट्र बनवण्याची गरज नाही. येथे राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. मी सुध्दा एक ख्रिश्चन हिंदू आहे." मुळात डिसूझा यांनी गोव्याचे मंत्री दीपक धवळीकर यांना वाचवण्यासाठी हे वक्तव्य केले.

धवळीकर काय म्हणाले होते?
गोव्याचे मंत्री दीपक धवळीकर यांनी गोवा विधानसभेत भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. नरेंद्र मोदी यांच्या विजयावर देण्यात आलेल्या धन्यावाद प्रस्तावात ते म्हणाले की, "मला खात्री आहे की मोदी यांच्या नेतृत्वात भारत एक हिंदू राष्ट्र बनले. मला असे वाटते की पंतप्रधान या बाबतीत नक्कीच काम करतील." मात्र या प्रकरणी स्पष्टीकरण देताना त्यांनी आपल्या वाक्याला विकासाशी जोडून घेतले. दीपक धवळीकर हे भाजपच्या सहाय्यक गोमंतक पक्षाचे नेते आहेत.

राजकीय पक्षांनी केली निंदा, संघाने घेतली बचावासाठी उडी
दीपक धवळीकरांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून विरोध करण्यात आला. काँग्रेसचे नेते रशिद अल्वी म्हणाले, "अशा प्रकारचे वक्तव्य होते ही चिंतेची बाब आहे. भारतात 70 टक्के लोकांनी भाजपला निवडले नाही. यांच्याच पक्षाचे लोकं मोदींसाठी बी पेरत आहेत ज्यामुळे त्यांचे येणार्‍या काळात नुकसान होईल." तर दुसरीकडे जदयू नेते अली अन्वर म्हणाले, त्यांना येथे दुसरे पाकिस्तान बनवायचे आहे. समाजवादी पक्षाचे नेत नरेश आग्रवाल यांनी हा देश सर्वांचाच आहे असे म्हटले. तर सीपीआय नेते अतुल अंजान यांनी नरेंद्र मोदी यांनी या बाबतीत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.
या सर्व प्रकारात धवळीकरांना वाचवण्यासाठी संघाने उडी घेतली आहे. आरएसएसचे विराग पाचपोरे म्हणाले की, हिंदूत्वाचा संबंध धर्माशी नाही, तर राष्ट्रीय ओळखीशी आहे. धवळीकरांच्या वक्तव्याला समजून घेण्याची गरज आहे.
फाइल फोटो : गोव्याचे मंत्री दीपक धवालीकर