आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या स्कार्फवरून गोवा विधानसभेत दोन आमदारांत वादावादी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - मुलींच्या स्कार्फ बांधण्यावरून गोवा विधानसभेत दोन आमदारांत वादावादी झाली. काँग्रेसचे एलेक्सो रेगिनाल्डो लॉरेन्सो यांनी लक्षवेधी मांडत दुचाकीवरील मुलींच्या चेहरा झाकण्यावर शंका घेतली. त्यावर हा महिलांचा अवमान असल्याचे काँग्रेसचेच मॉविन गॉडिन्हो म्हणाले.
स्कार्फ बांधणार्‍या मुली ओळखायला येत नाहीत. अतिरेकीही स्कार्फमध्ये वावरू शकतात, असे लॉरेन्सो म्हणाले. त्यावर स्कार्फवर बंदी नाही. अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून बचावासाठी मुली स्कार्फ बांधतात. अतिरेकी स्कार्फ घालतात असा गुप्तचर इशारा नाही. त्यामुळे यास ओळख लपवण्याचा प्रयत्न म्हणता येत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे निवेदन संपताच गॉडिन्हो यांनी प्रस्तावाला हरकत घेतली. हा महिलांचा अवमान असून, लक्षवेधीला परवानगी दिली जाऊ नये, असे ते म्हणाले.