आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशी डिटेक्टरने आजमावणार ‘देवकण’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - जगाच्या निर्मितीचे गूढ जाणून घेण्यासाठी जीनिव्हात गेल्या चार वर्षांपासून महाप्रयोग सुरू आहे. या महाप्रयोगात पंजाब विद्यापीठाचाही महत्त्वाची भूमिका आहे. कारण प्रयोगासाठी लागणाऱ्या डिटेक्टरच्या निर्मितीची जबाबदारी पंजाब विभागाच्या भौतिकशास्त्र विभागावर सोपवण्यात आली आहे.

पंजाबच्या फिजिक्स विभागात त्यासाठी नवीन प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे. त्यात सेंट्रल मिनिस्ट्री फॉर सायन्स अँड टेक्नाॅलॉजीचीदेखील मदत घेतली जाणार आहे. फिजिक्स विभागाचे प्रोफेसर जे. बी. सिंह म्हणाले, पुढल्या वर्षी जूनपूर्वी हे डिटेक्टर तयार करून देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १० डिटेक्टर तयार करून पाठवायचे आहेत. गेल्या वेळी ९०० डिटेक्टर पाठवण्यात आले होते. परंतु यावेळच्या डिटेक्टरचा आकार पूर्वीपेक्षा लहान आहे. त्यामुळे आव्हानही मोठे आहे. पंजाब विद्यापीठाबरोबरच भाभा विद्यापीठ अणुसंशोधन केंद्र व दिल्ली विद्यापीठातही डिटेक्टर तयार केले जाणार आहे.

पार्टिकलचे नेमके स्वरूप सांगणार
डॉ. जे.. बी. सिंह म्हणाले, महाप्रयोगादरम्यान लार्ज हायड्रोजन कोलायडर यंत्रात हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या नेचरचे पार्टिकल तयार होतात. त्यांच्यात टक्कर होते. त्यातून ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे पार्टिकलचे नेचर वेगळे असते. यंत्रात इन्स्टॉल करण्यात आलेल्या डिटेक्टरची टक्कर झाल्यानंतर पार्टिकल कोणत्या नेचरचे आहेत व कोणत्या तंत्रज्ञानाला सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतील हे ठरवले जाते.

जिज्ञासा : जग सुरुवातीला कसे होते हा महाप्रयोग जिनिव्हापासून ३७ किलोमीटर लांबीच्या बोगद्यात होत आहे. त्यात लार्ज हायड्रोजन कोलायडर यंत्रात अतिशय वेगवान पार्टिकल्समध्ये टक्कर होते. टक्कर झाल्यानंतर नवीन पार्टिकल्समुळे जगाच्या उत्पत्तीच्या कारणांचा वेध घेणे शक्य होणार आहे. महाप्रयोगात कम्युनिकेशन नेटवर्कच्या गती वाढवण्याच्या शक्यतांही लक्षात येईल.

टीम पीयू : डाॅ. जे. बी. सिंह, डॉ. जे. एम. कोहली, डॉ. मंजित कौर, डॉ. विपिन भटनागर व डॉ. सुमन बेरी या महाप्रयोगासाठी सायंटिफिक रिसर्च व उपकरणांना तयार करण्यासाठी मदत करतील. संशोधकांना उपकरणांच्या इन्स्टॉलेशन व प्रयोगादरम्यान जिनिव्हामध्ये रहावे लागणार आहे. पहिल्यांदाच पीयूने २०१४ मध्ये डिटेक्टर तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

आव्हानेही : डिटेक्टर अतिशय सावधपूर्वक तयार करावे लागतील. कारण महाप्रयोगादरम्यान निर्माण होणाऱ्या ऊर्जेत डिटेक्टरचे नुकसानदेखील होता कामा नये याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. अपेक्षित निकालही समोर यायला हवा. लहान चूकही अपयशाला कारणीभूत ठरू शकते.
बातम्या आणखी आहेत...