आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वयंघोषित देव सारधी बाबाला अटक; तरुणीसोबत रात्र घालवल्‍याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - ओडिसाचे प्रसिद्ध संत सारधी बाबा हे एका तरुणीसोबत हॉटलमध्‍ये थांबले. एवढेच नाही तर त्‍यांनी व्हिस्कीचे पेगही रिचवले आणि नॉनवेज खाल्‍ल्‍याचा भांडाफोड एका स्‍थानिक वृत्‍तवाहिनेने याचा भांडाफोड केला. त्‍यामुळे मागील तीन दिवसांपासून बाबांच्‍या केंद्रापाड आश्रमापुढे नागरिक निर्दशने करत आहेत. दरम्‍यान, ओडसाच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखा पथकाने शुक्रवार रात्री ते शनिवारी सकाळपर्यंत सलग 12 तास बाबाची चौकशी केली. नंतर त्‍याला अटक करून कटक येथे आणले गेले. ज्‍या हॉटेलमध्‍ये तो थांबल्‍याचा आरोप आहे त्‍या हॉटेलमधील सीसीटीवी फुटेज पोलिस पाहात आहेत. मात्र, हा आपल्‍याला बदनाम करण्‍याचा डाव असल्‍याची प्रतिक्रिया बाबानी दिली.
कोण आहे हा बाबा?
सारथी बाबाचे खरे नाच संतोष राउला आहे. तो केंद्रापाड़ामधील बारीमूल आश्रम चलवतो. त्‍याची स्‍थापना वर्ष 1992-93 मध्‍ये केली गेली होती. ओडिसातील शेतकरी आणि व्‍यवसायिक त्‍याला देवाचा अवतार मानतात. त्‍यामुळे त्‍याचा मोठा भाविक वर्ग आहे.
काय आहेत बाबांवर आरोप
गत महिन्‍यात सारथी बाबा हे हैदराबादला गेले होते. त्‍या ठिकाण त्‍यांनी एका एमबीबीएसच्‍या विद्यार्थिनीसोबत हॉटेलमध्‍ये मुक्‍काम केला. दरम्‍यान, व्हिस्कीचे पेग रिचवत त्‍यांनी चिक्‍कनही खाल्‍ल्‍याचा दावा वृत्‍तवाहिनेने केला. तसेच त्‍यांनी बाबांचे काही फोटोजही दाखवलेत त्‍यात बाबा जींस आणि टी-शर्टमध्‍ये दिसत आहेत.
कोण आहे तरुणी
ज्‍या तरुणीसोबत बाबांनी रात्र काढल्‍याचा आरोप ती त्‍यांची प्रेयसी आहे. यापूर्वी ते अनेकदा तिला अशाप्रकारे भेटले असल्‍याचा दाव वृत्‍त वाहिनेने केला आहे. मात्र, यावर खुलासा देताना बाबा म्‍हणाले, ''प्रवासादरम्‍यान कधी कधी नॉर्मल कपडे घालत असतो. त्‍यात वाईट काय आहे?'' असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला.
बाबांची चौकशी, अडचणी वाढणार
या आरोपानंतर स्थानिक लोकांनी बाबांना अटक करण्‍याची मागणी केली. लोकांचा वाढता विरोध पाहून पोलिसांनी गुरुवारी बाबाच्‍या संपत्‍तीची चौकशी केली. दरम्‍यान, क्राइम ब्रांचचे एडीजी बी.के. शर्मा ने म्‍हणाले, की बाबा विरोधात येणा-या प्रत्‍येक तक्रारीची आपण चौकशी करणार आहोत, असे त्‍यांनी सांगितले.
आश्रमावर दगडफेक
बाबांना अटठक करावी या मागणीसाठी स्‍थानिक नागरिकांनी बाबाच्‍या आश्रमावर दगडफेक केली. हा आश्रम 1992-93 बांधला गेला आहे. ओडिसामध्‍ये बाबाचे लाखो भक्‍त आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...