आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामपालच्या खासगी कक्षात राहात होत्या सहा सेविका, खात होता धोत्र्याचे औषध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार (हरियाणा) - बाबा रामपालच्या विशेष कक्षात त्याच्या बहिणीसह सहा सेविका राहात होत्या. रामपालचा अनुयायी मनोजने पोलिसांना सांगितले, की रामपालच्या पाच सेविका त्याच्या विशेष कक्षात राहात होत्या. तो त्यांना त्याच्या बहिणीच्या नावाने हाक मारत होता. त्यात त्याची एक बहिण देखील होती.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत रामपालने सांगितले, आश्रमात त्याची 50 वर्षीय बहिण राजबाला, जींद येथील सावित्री (55), धनाना येथील निलम (22), सोनीपतची गीता (30), बबीता आणि राजस्थानमधील अमेठ येथील टीना (22) या राहात होत्या. यांच्याशिवाय इतर कोणत्याही महिलेला बाबाच्या खासगी कक्षात प्रवेश दिला जात नव्हता.
काळ्या-पांढर्‍या धोत्र्यापासून बनविलेले औषध घेत होता रामपाल
रामपालचा अनुयायी आणि सेवक असलेला मनोज सध्या पोलिस कोठडीत आहे. आश्रमातील पुरुष अनुयायांपैकी तो एकमेव असा होता ज्याला बाबा रामपालच्या खासगी कक्षात प्रवेश होता. त्याने खुलासा केला आहे, की रामपालच्या भोजनासह औषधांची व्यवस्था माझ्याकडे होती. रामपाल काळ्या - पांढर्‍या धोत्र्यापासून तयार झालेले एक औषध घेत होता.
रामपालच्या सांगण्यावरुन महिला आणि मुले आश्रमात बंद
पोलिस आणि सतलोक आश्रमाचे खासगी कमांडो यांच्यात झडप उडाल्यानंतर आश्रमातील महिलांनी आम्हाला बाहेर जाऊ द्या, असा टाहो फोडला होता. महिलांनी रामपालविरोधात विद्रोह केल्यानंतर त्यांना लहान मुलांसह आश्रमातील एका मोठ्या हॉलमध्ये बंद केले होते. तिथे श्वास गुदमरून चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. याचा खुलासा आश्रमाचा प्रमुख रामपालची अनुयायी बबीता उर्फ बेबीने पोलिस कोठडीतील चौकशीत केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, कोट्यवधींची संपत्तीचा मालक रामपालकडे जामीनासाठी नाही 20 हजार