आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप रे! खतरनाक प्राणी तोंडात धरून जत्रेला येतात हे भक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोंडात विषारी साप आणि घोरपड धरलेले भक्त. - Divya Marathi
तोंडात विषारी साप आणि घोरपड धरलेले भक्त.
जयपूर - राजस्थानच्या चुरूमध्ये एक अशी जत्रा भरते, जेथे भक्त साप आणि घोरपड घेऊन येतात. जन्माष्टमीनंतर येणाऱ्या नवमीला ही जत्रा भरते. गोगाजी यांना राजस्थानातील लोक देव मानतात.
 
तोंडात साप आणि घोरपड धरून करतात स्टंट...
- काही दिवसांपूर्वीच चुरूमध्ये ही जत्रा भरली होती. राज्यभरातील भक्त येथे आले होते.
- भक्त अगोदर मातीपासून गोगाजी बनवतात आणि त्यांना खीर-पुरीचा नैवेद्य दाखवतात. मग हा प्रसाद घरीदारी वाटण्यासाठी नेतात.
- जत्रेत येणारे अनेक जण डोक्यावर लोखंडाची चेन मारतच येतात. यामागे अशी मान्यता आहे की, असे केल्याने गोगाजी प्रसन्न होतील.
- येथील लोक गोगाजींना सापांची देवता म्हणून पूजा करतात.
- येथील लोक गोगाजींना सापांची देवता मानतात म्हणूनच जत्रेत साप आणि घोरपडीसोबत स्टंट करताना दिसतात.
- ते सापांसोबत खेळतच त्यांना तोंडात धरून स्टंट करतात. या विषारी जिवांची त्यांना भीती वाटत नाही.
- यंदाच्या जत्रेतही हेच दृश्य होते. जत्रेत आलेले अनेक जण गळ्यात आणि तोंडात साप धरून आलेले होते.
 
राजस्थानातील लोकदेवता आहे गोगाजी 
- राजस्थानात गोगाजी हे स्थानिकांची कुलदेवता आहेत. चुरूच्या ददरेवा गावात त्यांचा जन्म झाला होता.
- गोगाजी यांना फक्त हिंदूच नाही, तर मुस्लिमही मानतात. मुस्लिम त्यांना जहांपीर म्हणून ओळखतात.
- गोगाजी चौहान वंशाचे राजा होते. पराक्रमी पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर चौहान वंशाचे जर कुणी प्रसिद्ध झाले आहे तर ते गोगाजीच आहेत.
- राजस्थानात त्यांना गोगाजी, गुग्गा, जाहिर वीर आणि जहरपीर आदी नावांनी ओळखले जाते.
गोगाजींना नैवेद्यात हे आहे पसंत
- नवमीला होणाऱ्या पूजेत गोगा भगवान यांना खीर-चुरमा आणि बत्ताशांचा भोग लावला जातो. सोबतच रक्षाबंधनला त्यांना राखीही अर्पण केली जाते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या रंजक जत्रेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...