आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याने केला आहे पत्नीचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमाने उडवून देण्याची धमकी देणारा गोकुळ - Divya Marathi
विमाने उडवून देण्याची धमकी देणारा गोकुळ
बंगळुरु - दिल्ली आणि बंगळुरुच्या सहा आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या गोकूळने पोलिस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गोकूळने दोन महिन्यांपूर्वी पत्नीचा खून केल्याचे चौकशीत सांगितले आहे. प्रेयसीच्या पतीला फसविण्यासाठी विमानतळावर धमकीचा फोन केल्याचेही गोकुळने कबूल केले. दुसरीकडे त्याची प्रेयसी म्हणाली गोकुळच्या मुलीचा मी सांभाळ करणार आहे कारण त्यासाठीच हे सर्व केले आहे.
काय आहे प्रकरण
बंगळुरुचा रहिवासी असलेला गोकुळ याला काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि बंगळुरु विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय विमाने उडवून देण्याची धमकी देण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. गोकुळने सांगितले, त्याचे त्याच्या वर्गमैत्रिण करुणावर (नाव बदलले आहे) प्रेम आहे. ती विवाहित असून तिच्या नवऱ्याला विमान उडवून देण्याच्या आरोपात अडकवण्याचा त्याचा कट होता. त्याला तुरुंगात टाकून गोकुळ करुणासोबत लग्न करणार होता. एवढेच नाही तर, गोकुळच्या पत्नीचे दोन महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झाले होते. ती आत्महत्या नव्हती तर मीच तिला मारले होते असेही गोकूळने सांगितले आहे. गोकुळला एक मुलगी आहे. तर त्याची प्रेमिका करुणा दोन मुलींची आई आहे. तिच्या पतीचे नाव सजू जोस आहे.
अजब प्रेम की गजब कहानी
गोकुळ पोलिसांच्या ताब्यात असून त्याची प्रेयसी करुणाने त्याच्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्विकरली आहे. करुणा म्हणाली, 'गोकुळ तरुंगात आहे आणि त्याची पत्नी अनुराधाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मी माझ्या मुलींसह त्याच्या मुलीचा सांभाळ करणार आहे. त्यासाठी मी माझ्या कुटुंबाची परवानगी घेणार आहे.'
पोलिसांचा होरा चूकला
पोलिसांना संशय होता की गोकुळची पत्नी अनुराधाच्या खूनात करुणाचाही हात असेल. त्यामुळे पोलिसांनी कित्येक तास तिची चौकशी केली मात्र अनुराधाच्या खूनाशी तिचा संबंध नाही या निर्णयाला पोलिस आले आहेत. करुणाने पोलिसांना सांगितले, 'गोकुळने माझ्यासाठी अनेक संकटे अंगावर घेतली आहेत. आता मी त्याला धोका देऊ शकत नाही. माझ्या दोन्ही मुलींसह मी त्याच्याही मुलीचा सांभाळ करेल.' गोकुळची मुलगी सध्या करुणासोबतच राहात आहे. करुणाने पोलिसांना सांगितले की, अनुराधाच्या मृत्यूनंतर ती गोकुळ आणि त्याच्या मुलीच्या अधिक जवळ आली आहे. पोलिसांच्या माहितीनूसार, 'गोकुळ कामानिमीत्त बाहेर गेल्यानतंर त्याच्या मुलीचा सांभाळ करुणाच करत होती.'

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो