आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंडोमचा उपयोग सोने तस्करीसाठी, पाच जणांच्या शरीरातून काढले पाच किलो सोने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - दिल्ली आणि वाराणसीच्या महसूल गुप्तचर पथकाने संयुक्त कारवाई करत येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिड कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. शारजाहून वाराणसीला आलेल्या विमानातील पाच युवकांना या प्रकरणी अटक करण्यात आले आहे. हे पाचही जण सोन्याची तस्करी करीत होते. यासाठीची त्यांची मोडस ऑपरेंटी अतिशय वेगळी होती. त्यांनी कंडोममध्ये सोन्याची नाणी आणि बिस्किट टाकून ते कंडोम शरीरात सोडले होते. त्यांच्या शरीरातून पाच किलो सोने निघाले आहे. त्याची आंदाजे किंमत दिड कोटीहून जास्त आहे.

दिल्लीच्या महसूल गुप्तचर संस्थेला माहिती मिळाली होती, की हरियाणा आणि पंजाब येथील काही युवक सोने तस्करीसाठी शारजाहून वाराणसीला येणार आहेत. त्यानुसार दिल्लीचे पथक सोमवारीच वाराणसीत दाखल झाले. मंगळवारी सकाळी 6.50 वाजता शारजाहून स्पाइस जेटचे विमान वाराणसी विमानतळावर उतरले तेव्हा गुप्तचर संस्थेच्या पथकाने कस्टम अधिका-यांच्या मदतीने पाचही जणांना सापळा रचून पकडले. त्यांच्या सामानाची तपासणी केली तर त्यात काहीच मिळाले नाही. तरीही त्यांना ताब्यात घेण्यात आले.