आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Golden Temple News In Marathi, Woman, Divya Marathi

...पण त्याच जपताहेत सुवर्णमंदिराची शान,महिलांना कीर्तन करण्यास बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - शिखांचे सर्वोच्च धार्मिक स्थळ सुवर्णमंदिरात महिलांना कीर्तन करण्याची परवानगी नाही. मात्र, तेथील लुप्त होणा-या भित्तिचित्रांचे जतन आणि संवर्धनाची जबाबदारी महिलाच पार पाडत आहेत. देशातील धर्म मानणा-या या महिला कलाकार लवकरच या भित्तिचित्रांना पूर्वीचे महत्त्व मिळवून देईल.


फ्रेस्को पेंटिंग नावाने ओळखली जाणारी ही कला ‘शिख स्कूल ऑफ आर्ट्स’ नावानेही ओळखली जाते. सुवर्णमंदिरातील मुख्य इमारतीच्या भिंती तसेच जिन्यांवर नैसर्गिक रंगांनी काढलेली ही चित्रे आजही सुंदर बारकावे आणि मनमोहक रूपामुळे जगविख्यात आहेत. 1830 मध्ये महाराजा रणजितसिंह यांनी सोन्याचे पत्रे चढवण्यास सुरुवात केली, तेव्हाच ही चित्रे काढण्यात आली होती. त्या वेळी शीख चित्रकार ज्ञानी संतसिंह यांनी मुस्लिम कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर 1910 मध्ये चित्रकार भाई ज्ञान सिंह नक्काश यांनी त्यावर पुन्हा काम केले. ते 32 वर्षे सेवा करत होते. 1962 मध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने पुन्हा यावर काम करून घेतले. त्यादरम्यान रंगांमध्ये वॉर्निशचा वापर होत असल्यामुळे हळूहळू चित्रांची झीज होऊ लागली. सहा सदस्यांची महिला टीम त्याच्या संवर्धनाचे काम करू लागली आहे.