आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षणमंत्री पर्रीकर निवृत्त सैनिकांना देणार लवकरच 'गोड बातमी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - निवृत्त सैनिकांसाठी महत्त्वाची असणारी ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेबद्दल केंद्र सरकार लवकरच गोड बातमी देईल असे, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.
बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लवकरात लवकर लागू करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. त्यानंतर गुरुवारी लखनौ येथे संरक्षण मंत्री पर्रीकरांनी गोडबातमी लवकरच देणार असल्याचे म्हटले आहे. ही योजना लागू न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही अण्णांनी दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करण्यासंबंधी सत्तेत येण्याआधी आणि नंतरही आश्वासने दिली होती. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. काँग्रेसनेही हा मुद्दा लावून धरला आहे.
बातम्या आणखी आहेत...