आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Give 1.70 Crore Package To Indore Students

इंदूरच्या विद्यार्थ्याला गुगलचे १.७० कोटींचे पॅकेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - आयआयटी- इंदूरमध्ये बी.टेकचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला गुगलने तब्बल १.७ कोटी रुपये वार्षिक पगाराच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. अमेरिकेच्या एखाद्या इंटरनेट कंपनीकडून भारतात कॅम्पस प्लेसमेंटद्वारे प्रमुख संस्थेतील विद्यार्थ्याला मिळालेले हे आजवरचे सर्वात मोठे पॅकेज आहे.

गौरव अग्रवाल हा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकच्या तृतीय वर्षात शिकत आहे. त्याने ही ऑफर स्वीकारल्याचे आयआयटी-इंदूरच्या प्रवक्त्याने सांगितले.देशातील आयआयटीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मिळालेली ऑफर सर्वात मोठी ऑफर आहे.