सहारनपूर- कोट्यावधी लोकांना उपयोगी ठरणाऱ्या
गुगलमूळे उत्तरप्रदेशातील एक तरूणीचा जीव वाचला आहे. सहारनपूरमधील ही तरुणी प्रेमात विश्वासघात झाल्यामुळे अतिशय दु:खी झाली होती. जीव देण्यासाठी अंबाला रस्त्यावरील एका ओढयाजवळ ती पोहोचली. त्यात उडी मारुन ती आयूष्य संपवणार होती.
आठ वर्षापूर्वी झाली होती मैत्री
- तरुणीने डीआयजी यांना सांगितले की, सहारनपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नौकरी करणाऱ्या युवकासोबत आठ वर्षापूर्वी तिची मैत्री झाली होती.
- काही वेळानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही एकत्र जगण्या-मरण्याच्या शपथा घेतल्या.
- शासकीय नौकरी मिळाल्यानंतर मुलगा बदलला. त्याने तरुणीसोबत विवाह करण्यास नकार दिला.
- यामुळे निराश झालेल्या तरुणीने जीव देण्याचा निर्णय घेतला.
- डीआयजी शाही यांनी सांगितले, मुलीची मनोअवस्था बघता या प्रकरणाला महिला पोलिस स्थानकाकडे सोपवण्यात आले आहे.
तरुणीने मानले गुगलचे आभार
- डीआयजी यांच्या कार्यालयामधून बाहेर पडल्यानंतर dainikbhaskar.com शी बोलताना तरुणीने सर्वप्रथम गुगलचे आभार मानले आहे.
- तरूणी म्हणाली, मला गुगलवर डीआयजी यांचा नंबर मिळाला नसता तर आज मी जिवंत नसते.
- 'मला आत्महत्येपासून वाचविण्याचे श्रेय प्रथम गुगलला आणि नंतर डीआयजी यांना जाते', असे तरूणीने सांगितले.
पुढील स्लाईड्सवर, इन्फोग्राफिक्सद्वारे जाणून घ्या पूर्ण घटना...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)