आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावगुंडाने केला 14 वर्षीय मुलीवर रेप, वडीलांनी ढकलले गंगेत, वाचा रेप पीडितेची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहपूर (उत्तर प्रदेश)- अल्पवयीन रेप पीडिता प्रेग्नंट झाल्यानंतर न्यायासाठी न्यायालयाचे दार न ठोठावता वडीलांनी तिला चक्क गंगा नदीत ढकलून या प्रकरणातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुदैवाने काही लोकांनी मुलीला नदीत बुडण्यापासून वाचवले. गंभीर परिस्थितीत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पीडितेचे वडील आणि रेपचा आरोप असलेल्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
गंगेतून अशी वाचली मुलगी
- फतेहपूर जिल्ह्यातील सांखा गावात एक गरीब कुटुंब राहत होते. मोलमजुरी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरु होता.
- या कुटुंबाला एक 14 वर्षांची मुलगी होती. या मुलीच्या आईचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
- वडील मोलमजुरीसाठी घराबाहेर जायचे. ही संधी बघून गावातील गुंड बिंदा प्रसाद याने मुलीवर बलात्कार केला.
- कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देऊन तो पसार झाला.
- तिने घटलेली घटना कुणालाही सांगितली नाही. पण प्रेग्नंट झाल्याचे समजल्यावर तिच्या पायाखालची जमिन सरकली.
- तिने वडीलांना घटलेली हकीकत सांगितले. त्यांनी तिला उपचार करण्यासाठी शहरात जावे लागेल असे सांगितले.
- तिला गंगेच्या किनारी आणले आणि जोरदार धक्का दिला. ती पाण्यात पडली. वडीलांनी तेथून पळ काढला.
- मुलगी पाण्यात पडल्याचे बघून इतर लोक धावून आले. त्यांनी मुलीला वाचवले. रुग्णालयात दाखल केले.
- जन्मदात्या वडीलांनीच गंगेत धक्का दिल्याने आता पुढे काय करायचे असा प्रश्न पीडितेसमोर आ वासून उभा आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या प्रकरणाशी संबंधित फोटो.....
बातम्या आणखी आहेत...