आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopal Kanda's Lawyer Slapped Geetika Sharma's Brother?

गोपाल कांडाच्या वकिलांनी न्यायालयातच गितिका शर्माच्या भावाच्या थोबाडीत लगावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : गोपाल कांडा, गितिका शर्मा)
नवी दिल्ली - रोहिणी येथील न्यायालयात गोपाल कांडा यांच्या वकिलांनी गितिका शर्मा यांच्या भावाच्या थोबाडीत मारल्याची चर्चा आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार दोन्ही पक्षांमध्ये प्रकरणाच्या पुढील सुनावणीच्या संदर्भात वादविवाद सुरू होता. त्यावेळी न्यायाधीशही त्याठिकाणी उपस्थित नव्हते असे सांगितले जात आहे.
पाच ऑगस्ट 2012 रोजी कांडा यांच्या एमडीएलआर कंपनीमध्ये एअर होस्टेस म्हणून काम केलेल्या 23 वर्षीय गितिका शर्मा यांनी अशोक विहार येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या दोन पानी पत्रामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी गोपाल कांडा आणि एमडीएलआर एअरलाइन्सच्या अधिकारी अरुणा चड्डा यांना जबाबदार ठरवले होते. गितिका यांच्या आत्महत्येनंतर काही महिन्यांनी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती.