आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूर दुर्घटना: बालमृत्यूस कारणीभूत तिसरा आरोपी डाॅ. कफिल खान अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर- उत्तर प्रदेशच्या एसटीएफ पथकाने बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बालमृत्यूस कारणीभूत ठरलेले तिसरे आरोपी डॉ. कफिल खान यास अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी डॉ. कफिल आणि डॉ. सतीशसह ७ अारोपींना फरार घोषित करण्यात आले. गेल्या महिन्यात येथील बाबा राघवदास रुग्णालयात (बीअारडी) ३० बालकांसह ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला हाेता.  

यूपी एसटीएफचे पोलिस महासंचालक अमिताभ यश यांनी सांगितले, गोरखपूरमध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूनंतर या डॉक्टरवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांनी तपासास सहकार्य करण्याऐवजी ठाण्यात येण्यास टाळाटाळ चालवली होती. यामुळे त्यांना एसटीएफने अटक केली. या दोघांनाही गोरखपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.   ३० ऑगस्ट रोजी बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार धरून माजी प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी पूर्णिमा शुक्ला यांना कानपूरहून अटक करण्यात आली. दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...