आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण: न्यायालयीन चौकशीसाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- गोरखपूरच्या बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात मुलांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
 
सामाजिक कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,‘माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार मुलांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाला आहे, पण राज्य सरकार आणि त्यांच्या संस्था ते मान्य करत नाहीत. अशा परिस्थितीत राज्य सरकार काही लपवू पाहत आहे आणि कदाचित काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा संदेश जात आहे.’

याचिकेत म्हटले आहे की, ‘मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेले पथक सरकारचेच समर्थन करेल, असे लोक मानतात. त्यामुळे सर्व वस्तुस्थिती समोर येण्यासाठी आणि दोषी व्यक्तींचा बचाव होऊ नये म्हणून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होण्याची गरज आहे.’

गोरखपूरसारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारला निर्देश देण्याचा आग्रह याचिकेत करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर बंदी घालण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश पूर्णपणे लागू करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...