आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूर : बालमृत्यू प्रकरणात चौथ्या आरोपीस अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- शासकीय बाबा राघवदासजी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी ६० मुले दगावली होती. या प्रकरणातील चौथ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर पांडे यास शुक्रवारी रात्री उशिरा खजांची चौकाजवळ पकडले. त्याच्यावर सध्या तुरुंगात असलेले माजी डीन राजीव मिश्रा यांच्याशी संगनमत करून दलाली मिळवण्याच्या लालसेतून ऑक्सिजन पुरवठादाराचे देयक रोखून ठेवल्याचा आरोप आहे. तसेच शासकीय चौकशीत इतर थकीत देयके न दिल्याचाही आरोप आहे.  एसटीएफ पथकाने यापूर्वीच तीन मुख्य आरोपी राजीव मिश्रा, पूर्णिमा मिश्रा आणि कफील खान यांना अटक केली आहे. ते सध्या तुरुंगात आहेत.
बातम्या आणखी आहेत...