Home »National »Other State» Gorakhpur Hospital: 64 Deaths In 5 Days

गोरखपूर घटनेवर सीएम योगी म्हणाले, दोषींना सोडणार नाही; तर काँग्रेस म्हणे 'हे सरकार खुनी'

दिव्य मराठी नेटवर्क | Aug 14, 2017, 06:09 AM IST

  • योगी आदित्यनाथ यांनी रुगणालयात येताच 2 आरोग्य अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले.
गोरखपूर- येथे मेडिकल कॉलेजमध्ये 70 मृत्यू झाल्यानंतर शनिवारी राज्य सरकारने सारवासारव केली. ५ तासांत दोन वेळा स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन मंत्र्यांव्यतिरिक्त केंद्रीय आरोग्यमंत्रीही सरकारच्या बचावासाठी धावल्या. राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथसिंह म्हणाले, ‘बीडीआर कॉलेजमध्ये तर रोज सरासरी १७-१८ मृत्यू हाेतातच. अॉक्सिजनअभावी कुणीही दगावले नाही.’ मात्र, सरकारने कारवाई का केली, हा प्रश्नच आहे. कारण मेडिकल कॉलेजचे प्राचार्य राजीव मिश्र यांना निलंबित करण्यात आले. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्सवरही एफआयआर दाखल झाला.
काय म्हणाले योगी?
- गोरखपूरच्या रुगणालयात ऑक्सिजनच्या आभावी जवळपास 70 बालकांचा मृत्यू झाला. गेल्या 2 -3 दिवसांपासून सुरू असलेल्या वृत्तावर पीएम मोदी चिंतीत आहेत. त्यांनी मला फोन करून मदतीचे आश्वासन दिले आहेत.
- मोदींनी आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांना उत्तर प्रदेशात पाठवून आढावा घेण्यास सांगितले आहे. मी सुद्धा अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखरेख व चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही.
- प्रत्येक रुगणालयात नोडल ऑफिसर पाठवून आणि तपास समिती सुद्धा चौैकशी करत आहे.

योगींच्या बचावासाठी २ मंत्री, एक केंद्रीय मंत्री सरसावले, मांडली अशी बाजू...

दुपारी ३.३० वाजता : मंत्री सिद्धार्थ नाथ यांनी २३ मृत्यू होण्यामागचे कारण सांगितले. ऑगस्टमध्ये झालेल्या मृत्यूंचा आकडाही समजावून सांगितला.
ऑगस्ट महिन्यात मृत्यू होतातच. २०१४ मध्ये याच महिन्यात ५६७ मुलांचा मृत्यू झाला. म्हणजे रोज १९. २०१५ मध्ये ६६८, म्हणजे रोज २२ मृत्यू. २०१६ मध्ये ५८७ म्हणजे रोज १९-२०. ऑक्सिजनअभावी २३ मृत्यू नाहीत. रात्री ११.३० ते १.३० पर्यंत गॅस नव्हता. मात्र, यादरम्यान एकही मृत्यू झाला नाही.

सायं ७.४५ :सीएम योगी म्हणाले- मीडियाने वास्तव व कारण दाखवावे, ही मानवतेची मोठी सेवा होईल
७ ते ११ ऑगस्टपर्यंत ६४ मृत्यू झाले. २३ तर २४ तासांतच झाले. ऑक्सिजनसाठी २०१४ मध्ये ८ वर्षांचा करार झाला. ७ दिवसांत चौकशी अहवाल येईल. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाले म्हणणे हे नृशंस कृत्य आहे.

सायं ८.०० वाजता :आरोग्यमंत्री आशुतोष टंडन म्हणाले- ६९ लाखांची मागणी होती, २ कोटी रुपये दिले
पुरवठादाराने ४ ऑगस्टला पत्रात ६९ लाख रुपये थकीत रक्कम दाखवली. ५ रोजी २ कोटी पाठवले. प्राचार्यांनी मात्र ११ तारखेला रक्कम दिली. यामुळे त्यांना निलंबित केले. वादाची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती.

केंद्र सर्वतोपरी मदत करेल : केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

मुलगा तर वाचला नाहीच वर डॉक्टरनी सांगितले, मंत्री गेल्यावर मृतदेह मिळेल... ९ तासांनी मिळाला मृतदेह
राजभर मूळ बिहारचे रहिवासी. चार दिवसांपूर्वी मुलगी जन्मली. तिचे नाव ठेवले गुडिया. दोन दिवसांनंतर ती आजारी पडली. उपचारासाठी गुडियाला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये आणले. गुरुवारी रात्री तीन वाजता तिला दाखल केले. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता गुडियाचा मृत्यू झाला. ऑक्सिजनअभावीच गुडिया गेली असा राजभर यांचा दावा आहे. डॉक्टरांनी मात्र वास्तव लपवले. ३० मृत्यू झाल्यावर प्रशासनाचे धाबे दणाणले आणि राजभर यांना मुलीचा मृतदेह देण्यात आला. पोलिसांच्या निगराणीखाली बिहारची रेल्वे पकडा, असे त्यांना सांगण्यात आले. अशा हृदयद्रावक शेकडो कहाण्या आज रुग्णालयात इन्सेफ्लायटिस वॉर्डातील रिकाम्या खाटा सांगत आहेत. ७ ते ११ ऑगस्टदरम्यान पूर्व उत्तर प्रदेशातील या सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात ६४ जणांचा मृत्यू झााला आहे. कुशीनगरहून आलेले लोरिक यादव सांगतात, ‘आम्ही नातू आजारातून उठेल, धडधाकट होईल म्हणून आणले होते. या लोकांनी त्याचा मृतदेहच आम्हाला सोपवला. काल संध्याकाळपर्यंत कुणीच काही सांगत नव्हते. मुलगा वाचू शकला नाही म्हणून सकाळी सांगितले. आता आम्ही कुठे जायचे?’ सिद्धार्थनगरचे रामसकल यांच्या १५ दिवसांच्या चिमुकलीचा सकाळी ८ वाजता मृत्यू झाला होता. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की, ‘मंत्री गेल्यानंतर मृतदेह नेण्यासाठी या...’ शेवटी सायंकाळी मृतदेह ताब्यात मिळाला.

ज्यांची मुले वाचली नाहीत त्यांची ही अवस्था आहे. मात्र, ज्यांची मुले अजूनही दाखल आहेत त्यांच्या समस्या वेगळ्याच. बहुतेक लोक वॉर्डाच्या दाराकडे टक लावून बसलेले दिसतात. पायऱ्यावर सुमनला रडू आवरत नव्हते. कुटुंबीयांनी सांगितले की तिची मुलगी चार दिवसांपासून रुग्णालयात आहे. वॉर्डाच्या आत तर आणखी वाईट स्थिती. सुमारे ६-७ वर्षांची एक मुलगी खाटेवर बेशुद्ध आहे. डॉक्टर प्रयत्न करत आहेत. मुलीची हालचाल बंद आहे. एवढ्यात खिडकीतून कुजबूज ऐकू येते, ‘...गेली वाटते.’ सायंकाळी कळाले की या मुलीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. रामजस मुलाला घेऊन ११ दिवसांपूर्वी आले. ते म्हणतात, ‘डॉक्टर रोज मुलाचे रक्त काढून नेतात. सांगत काहीच नाहीत... आज म्हणताहेत, शंभरातून असा एखादाच वाचतो.’ रामजस यांची पत्नी म्हणते, ‘आम्हाला तर खिडकीजवळही उभे राहू दिले जात नाही. मुलाला एकदा पाहू तरी द्या...’
हे ही वाचा..

Next Article

Recommended