आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपुर ट्रॅजेडी: हॉस्पिटलला ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कंपनी मालकाला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर - बीआरडी मेडिकल कॉलेज दुर्घटनेत चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी पुष्पा सेल्सचे मालक मनीष भंडारी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी कोर्टात अर्ज देऊन आत्मसमर्पणाची परवानगी मागितली होती. तथापि, गोरखपूर बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये 7 ते 12 ऑगस्टदरम्यान 30 लहान मुलांसमवेत 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि पुष्पा सेल्सदरम्यान पेमेंटवरून वाद असल्याने कंपनीने हॉस्पिटलचा ऑक्सिजन सप्लाय बंद केल्याचा आरोप आहे. तसेच चिमुकल्यांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी 9 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यात 8 जणांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. 
 
बिहारला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मनीष...
- पोलिसांनुसार, मनीषला रविवारी सकाळी गोरखपूरच्या देवरिया बायपास रोडवरून अटक करण्यात आली. तो बिहारमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
- शनिवारी मनीषच्या वकिलांनी कोर्टात सरेंडर अॅप्लिकेशन दिले होते, तेव्हापासूनच त्याला ट्रेस केले जात होते.
- सध्या त्याची चौकशी सुरू असून आतापर्यंत तो कुठे-कुठे राहिला याची माहिती घेतली जात आहे. रविवारी कोर्ट बंद असल्याने मनीषला सोमवारी कोर्टापुढे हजर करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...