आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यटकांसाठी गोव्यात प्रथमच सी प्लेनचे लॅडिंग, मच्छीमारांचा विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- मच्छीमारांकडून कडाडून विरोध होत असतानाही गोव्यातील मांडवी नदीत आज (शनिवार) प्रथमच सी-प्लेनचे लॅडिंग झाले. मांडवी नदीत सी प्लेन उतरवून गोवा सरकारने मच्छीमारांचा रोष ओढवून घेतला आहे.

यापूर्वी पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मेरिटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (मेहर) यांच्या संयुक्तरित्या मुंबईत यशस्वी प्रयोग केला होता. त्या पाठोपाठ आता गोवा सरकारने हा प्रयोग केला आहे.

डाबोलिम एअरपोर्टवरून उड्डान घेतलेले 9 सीटर सी प्लेन पावणे बाराच्या सुमारास मांडवी नदीत यशस्वी उतरले. पर्यटकांना आकर्षित करणे, हा गोवा सरकारचा मुळ उद्देश आहे. या सेवेसाठी गोवा सरकारने एका खासगी कंपनीशी करार केला आहे. परंतु, या सेवेला गोव्यातील मच्छीमारांकडून कडाडून विरोध होत आहे.

या सेवेमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. परिणामी मासेमारांनी गोवा सरकारला आत्महत्या करण्‍याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, शनिवारी सी प्लेनची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप पारुळेकर यांनी स्पष्‍टीकरण दिले आहे. सी प्लेनमुळे मच्छीमारांच्या रोजगारावर काहीही परिणाम होणार नाही. मासेमारीची पारंपारिक पद्धत मच्छीमारांनी सरकारला नव्याने सांगू नये, सी प्लेन सेवा पर्यटकांसाठी एक वेगळे आकर्षण ठरणार आहे. यामुळे पर्यटकांचा वेळ आणि पैशाची बचत होणार असल्याचे पारुळेकर यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित PHOTO & VIDEO