आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडमध्‍ये जाळपोळ, हिंसाचार; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये महिलांच्‍या आरक्षणाला विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोहिमा- स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये महिलानां 33% आरक्षण देण्‍याच्‍या विरोधात नागालँडची राजधानी कोहिमामध्‍ये आंदोलन पेटले आहे. गुरुवारी संध्‍याकाळी आंदोलनकर्त्‍यांनी कोहिमाचे महानगरपालिकेचे कार्यालय आणि विभागीय सचिवालयाच्‍या कार्यालयाला आग लावली. कोहिमाच्‍या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्‍याचेही वृत्‍त आहे. परिस्‍थतीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी राज्‍य सरकारने लष्‍काराला पाचारण केले आहे. 
 
- नागालँडमध्‍ये महिलांना स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये 33% आरक्षण देण्‍यास तेथील आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे. 
- 1 फेब्रुवारी रोजी राज्‍यभरात याविरोधात बंद पुकारण्‍यात आला होता. 
- याआधी 31 जानेवारी रोजी झालेल्‍या आंदोलनामध्‍ये पोलिस आणि आंदोलनकर्त्‍यांमध्‍ये झालेल्‍या झटापटीदरम्‍यान 2 युवकांचा मृत्‍यू झाला होता. बरेच आंदोलकही यावेळी जखमी झाले होते.
- बुधवारी, 1 फेब्रुवारी रोजी त्‍यांचा मृतदेह आंदोलनकर्त्‍यांनी कोहिमा शहरात आणला. तेव्‍हापासून कोहिमामधील परिस्थिती स्‍फोटक बनली आहे.
- यामुळे शहरातील जनजीवन विस्‍कळीत झाले असून, शाळा व महाविद्यालय काही दिवस बंद ठेवण्‍यात आले आहेत. 
- मुख्‍यमंत्री टी.आर.जोलिआंग यांच्‍या‍ निवासस्‍थानासमोर आंदोलन करण्‍याची मागणी आंदोलनकर्त्‍यांतर्फे करण्‍यात आली आहे.
 
मुख्‍यमंत्र्यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी 
- दोन युवकांच्‍या मृत्‍यूसाठी नागालँड अॅक्शन कमिटीने (NTAC) मुख्‍यमंत्र्यांना जबाबदार धरले आहे. 
- गुरुवारी 4 वाजेपर्यंत मुख्‍यमंत्री आणि त्‍यांच्‍या मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी कमिटीतर्फे करण्‍यात आली होती. 
- सरकारशी या घटनेसंबंधी चर्चा करण्‍यासाठी NTACने एक समिती बनविली आहे. 
- या समितीमध्‍ये जेलिआंग, छखेसांग, अओ, पोचुरी, रेन्‍गमा, सुमी आणि लोथा या 7 आदिवासी संघटनांचा समावेश आहे. 
- या‍व्‍यतिरिक्‍त इस्‍टर्न नागालँड पब्लिक ऑर्गनायझेशन (ENPO) या संस्‍थेचा समितीमध्‍ये समावेश आहे. ENPO नागालँडमधील 6 जातींचे प्रतिनिधीत्‍व करते. 
- नागालँडचे राज्यपाल पी.बी.आचार्य यांना दिलेल्‍या निवेदनामध्‍ये NTACने म्‍हटले आहे की, मुख्‍यमंत्र्यांनी जनभावनेच्‍या विरोधात स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्थांच्‍या निवडणुका घेण्‍याचा निर्णय घेतला. यामुळे आंदोलन भडकले आहे. 
 
मृत युवकांना नागा शहिदांचा दर्जा 
- 31 जानेवारी रोजी पोलिसांनी केलेल्‍या गोळीबारात खरिएसाविजो अवीजो मेहता आणि बेंदंगनुंगसांग या दोन युवकांचा  मृत्‍यू झाला होता. 
- NTACने या युवकांना नागा शहिदांचा दर्जा दिला आहे. 
- NTACने म्‍हटले आहे की, या युवकांनी नागालँडच्‍या हक्‍कांसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिली आहे. 
- जोपर्यंत सरकार त्‍यांच्‍या मागण्‍या पूर्ण करत नाही, तोपर्यंत युवकांचा अत्‍यंसंस्‍कार केला जाणार नाही, असे NTACने  म्‍हटले आहे.  
 
का आहे महिलांच्‍या आरक्षणाला विरोध?
- महिला आणि पुरुष यांच्‍यामध्‍ये असलेले पारंपारिक संबंध आणि संस्‍कृतीवर या आरक्षणाचा विपरीत परिणाम होईल, असे आंदोलनकर्त्‍यांचे म्‍हणणे आहे. 
- नागालँडमधील आदिवासी संघटनांनी म्‍हटले आहे की, महिलांना स्‍थानिक प्रशासनामध्‍ये आरक्षण देणे म्‍हणजे त्‍यांच्‍या जीवनात हस्‍तक्षेप आहे.   
- राज्‍याच्‍या पोलिस महासंचालकांनी परिस्थिती आता नियंत्रणात असल्‍याचे म्‍हटले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...