आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंगणवाडी शिक्षिका-आशा वर्कर्स-मिड-डे मील स्टाफला मिळणार PF, 50 लाख जणांना लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंगणवाडी शिक्षिका, सेविका, आशा वर्कर्स आणि मिड-डे मील स्टाफ यांना लवकरच पीएफ आणि वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी मोदी सरकार त्यांना सामाजिक सुरक्षेंतर्गत आणण्याची योजना तयार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यासंबंधी 22 ऑगस्टला मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. असे झाले तर केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या या 50 लाख लोकांना विशेषतः महिलांना मोठा फायदा होऊ शकतो.
अर्थमंत्रालयाची संमती
- या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि सेंट्रल ट्रेड यूनियन भारतीय मजदूर संघादरम्यान मंगळवारी बैठक झाली. दिल्लीत झालेल्या या बैठकीत अंगणवाडी शिक्षिका, सेविका, आशा वर्कर्स आणि मिड-डे मील स्टाफ यांना पीएफ आणि वैद्यकीय सुविधा देण्यावर एकमत झाले.
- जेटलींनी यासंबंधी 22 ऑगस्ट रोजी ऑर्डर काढणार असल्याचे आश्वासन दिले. 22 ऑगस्ट रोजी जेटली भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत आणखी एक बैठक करण्याची शक्यता आहे.
- 2014 च्या सरकारी आकडेवारीनुसार देशात एकूण 24.58 लाख महिला अंगणवाडी शिक्षिका आणि सेविका म्हणून काम करतात.
- आशा वर्कर्सची संख्याही जवळपास 10 लाख आणि मिड डे मील स्टाफ 15 लाखांपर्यंत आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...