आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारकडून अमेठीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष : राहुल गांधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - मोदी सरकारने विकासकामांना ठप्प केले असून विद्यमान सरकार यूपीएच्या कामांचे श्रेय लाटत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी केंद्र सरकारवर केला आहे. अमेठीच्या दौर्‍यानंतर राहुल यांनी मोदी सरकारवर टीका केली.

काँग्रेस सत्तेत असताना भाजप सदस्यांचा आरोप होता की सर्व पैसा अमेठी मतदारसंघाच्या विकासासाठीच जात आहे.

आता तेच सदस्य आरोप करत आहेत की अमेठीत विकासच झाला नाही. राहुल यांनी तीनदिवसीय अमेठी दौर्‍यादरम्यान येथील रस्ते, मंगल कार्यालयांसारख्या सार्वजनिक सुविधांचे लोकार्पण केले. येथे घेतलेल्या सभेत राहुल म्हणाले, कोणताही पक्ष सत्तेत असू दे त्यांनी शेतकरी, कामगार व गरिबांच्या हितांना प्राथमिकता दिली पाहिजे. सरकारने अमेठीबाबतीत दुजाभाव करू नये. प्रस्तावित मेगा फूड पार्कचा मुद्दाही या वेळी बोलताना राहुल यांनी उपस्थित केला. स्थानिक शेतकर्‍यांचे हित यात असूनही भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भाजपला सूड घ्यायचा असेल, तर माझा घ्यावा. शेतकर्‍यांचे नुकसान करू नये.

मच्छीमारांना भेटणार राहुल
राहुल गांधी २६ मे रोजी दोन दिवसांच्या पदयात्रेसाठी केरळात जाणार आहेत. येथील त्रिशूर जिल्ह्यातील सागर किनार्‍यावरील गावातील मच्छीमारांची ते भेट घेतील.