आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Tell Ministries To Implement Key Budget Decisions

15 ऑगस्टची तयारी : अर्थसंकल्पातील घोषणांवर काम करण्याचे मंत्रालयांना निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये लाल किल्ल्याची प्रतिकृती असणारे व्यासपीठ तयार करण्यात आले होते. आता 15 ऑगस्ट रोजी मोदी प्रत्यक्षात लाल किल्ल्यावर भाषण करतील.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात जनतेला फार आशादायक अशा घोषणा ऐकायला मिळाल्या नाही. मात्र आता सरकारचे ध्येय या सर्व घोषणांवर अत्यंत वेगाने अंमलबजावणी करून वाहवा मिळवण्याचे असणार आहे. आगामी काही आठवड्यांत यापैकी काही योजना लागू करण्याचा मोदी प्रशासनाचा विचार आहे. कॅबिनेट सेक्रेटरी अडित सेठ यांनी सर्व मंत्रालयांसह विभागांना अर्थसंकल्पातील प्रस्तावांवर 10 ऑगस्टपासून काम करण्यास सांगितले आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील त्यावेळी बोलायला त्यांच्याकडे ठोस मुद्दे असायला हवे हे त्यामागचे कारण आहे.

सरकारचे लक्ष
पीएमओ अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अमंलबजावणीवरही लक्ष ठेवून आहे. तसेच धोरणांशी संबंधित इतर बाबींवरही नजर ठेवली जात आहे. नरेंद्र मोदी हे प्रथमच लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी सरकारच्या यशाचे गुणगान करता यावे म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत.
केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पातील घोषणांवर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 10 जुलैला मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. साधारणपणे दुस-या वर्षीचा अर्थसंकल्प आल्यानंतर आधीच्या अर्थसंकल्पाच्या घोषणांच्या अंमलबजावणीची लगबग सुरू होते. पण यावेळी सर्व विभागांना वेगाने काम करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.