आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Governor Asked Shiv Sena, BJP If They Form Interim Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रपती राजवट लागू करण्यापूर्वी सेना-भाजपला हंगामी सरकारसाठी राज्यपालांचे निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सकाळीच सह्या केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी शनिवारी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी राज्यातील शिवसेना आणि भाजप या पक्षांना राज्यात हंगामी सरकार स्थापन करण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

भाजप शिवसेना यांच्यात 25 वर्षांपासून असलेली मैत्री जागावाटपाच्या मुद्यावरून 25 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडीही तुटली होती. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा सादर केला होता.

राज्यपालांनी शनिवारी शिवसेना व भाजपला पत्र लिहिले होते, अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिली. राज्यातील सरकार अल्पमतात आल्याने दुस-या शक्यता पडताळून पाहण्यासाठी हे पत्र पाठवत असल्याचे राज्यपालांनी पत्रात म्हटले होते. तुमचा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो का? अशी विचारणा या पत्राद्वारे विद्यासागर राव यांनी केली होती. दोन्ही पक्षांकडून पत्राला उत्तर मिळाले नाही तर हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापू शकत नसल्याचे समजले जाईल असेही राव म्हणाले आहेत.

राज्यपालांच्या पत्रासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी राज्यात पक्षाला स्पष्ट बहुमत असेल तरच सत्ता स्थापनेबाबत विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आम्ही स्वतः सत्ता स्थापनेचा दावा करू असेही सुभाष देसाई म्हणाले.

अशाच प्रकारचे पत्र भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही पाठवण्यात आले होते. पण यासंदर्भात त्यांच्याकडून काहीही माहिती मिळू शकली नाही. ज्येष्ठ भाजप नेते विद्यासागर राव यांची गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली होती.