आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाली हिंदूंवर पाकचे सर्वाधिक अत्याचार, गुलाम अलींना टार्गेट करून राज्यपालांचे ट्विट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अगरतळा - त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले की, पाकिस्तानचे गायक गुलाम अली कोलकात्यात आहेत.
या पृथ्वीवर पाकिस्तानींनी बंगाली हिंदूंवर केलेल्या अत्याचारापेक्षा जास्त अत्याचार कोणीही सहन केला नाही. बंगाली विसरून गेल्याचे हरप्रसाद शास्त्री यांनी म्हटले आहे. (शास्त्री बंगाली भाषातज्ज्ञ होते.) यानंतर रॉय यांनी दुसरे टि्वट केले. त्यात लिहिले की, आश्गंजच्या (आताचा बांगलादेश) मेघना ब्रिज येथून १२ फेब्रुवारी १९५० रोजी जाणाऱ्या सर्व रेल्वे रोखण्यात आल्या. यामध्ये बसलेल्या एकएका हिंदूची कत्तल करण्यात आली. त्यांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले. त्रिपुराचे राज्यपाल होण्याआधी रॉय पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष होते. त्यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननच्या फाशीवेळीही वादग्रस्त विधान केले होते.
गुलाम अली म्हणाले, इथे आल्यावर वाटले ५० वर्षांनंतर आल्यासारखे
पश्चिम बंगाल सरकारच्या निमंत्रणावरून कोलकात्यात आलेल्या गुलाम अलींनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. ते म्हणाले, मी जिथे कार्यक्रम सादर करायला जातो तिथे मला आनंद मिळतो. मात्र, या वेळी इथे येण्याचा सर्वाधिक आनंद झाला. आल्यावर ५० वर्षांनंतर आल्यासारखे वाटले. कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमासाठी रसिकांमध्ये चित्रपट निर्माते महेश भट उपस्थित होते. ते म्हणाले, मुंबईत तयार झालेल्या वातावरणानंतर आम्ही आशा सोडून दिली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या पुढाकारातून गुलाम अली यांना पुन्हा एकदा भारतात ऐकता आले. ममतांचे त्यासाठी आभार. विशेष म्हणजे गेल्यावर्षी शिवसेनेच्या विरोधामुळे मुंबईत गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. यानंतर पश्चिम बंगाल सरकारच्या अल्पसंख्याक व मदरसा प्रकरणांच्या मंत्रालयाने त्यांना कोलकात्यास येण्याचे निमंत्रण दिले. राज्यात ममता बॅनर्जींकडे गृह मंत्रालय आहे.
बातम्या आणखी आहेत...