आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रकृतीची माहिती जाहीर करा, संताप निवळेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - गेल्या महिन्याच्या २२ तारखेपासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री रुग्णालयात उपचार घेत आहेत; परंतु त्याच्या प्रकृतीबद्दल कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यावरून समर्थकांत संताप उसळलेला असतानाच मद्रास उच्च न्यायालयाने प्रकृतीची माहिती बुधवारी (५ ऑक्टोबर) जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते रामास्वामी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करण्याची विनंती सरकारला करण्यात आली आहे. परंतु त्यावर उच्च न्यायालयाच्या पीठाने राज्यातील परिस्थितीवर तोंडी निरीक्षण नोंदवले व निर्देश दिले. सरकारी वकील सी. मणिशंकर यांना तशी सूचना केली आहे. जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी सामान्य माणूस उत्सुक आहे. त्यांचे समर्थक काळजीत पडले आहे.

त्यामुळेच त्यांची प्रकृती कशी आहे, त्याचा तपशील बुधवारी जाहीर केला जावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. जयललिता यांनी रुग्णालयातच मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती.

बैठकीला अधिकारी त्यांचे सहकारीदेखील उपस्थित होते. त्या बैठकीचा तपशील जाहीर करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. याचिकेवर कोणताही आदेश जारी केला जाणार नाही. सरकारने त्याबाबतचे योग्य पाऊल उचलावे, अशी सूचना देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. राज्यात जनतेमध्ये संतापाची लाट आहे.

दररोज बुलेटिन
जयललिता यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाच्या वतीने दररोज बुलेटिन जारी केले जाते. त्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचा तपशील दिला जातो. त्याशिवाय सध्याची स्थिती व उपचार इत्यादीविषयीदेखील सांगितले जाते, अशी सबब सरकारकडून देण्यात आली होती; परंतु कोर्टाने ती मान्य केली नाही.

राज्यात तीव्र संताप
अम्मांच्या समर्थकांमध्ये प्रकृतीवर अधिकच चिंता दिसून येत आहे. समर्थकांचा संताप दिसून येत आहे. सरकारकडून एकदा माहिती जाहीर करण्यात आली तर लाेकांमधील अस्वस्थता निवळू लागेल. अनेक ठिकाणी प्रार्थना झाल्या.
बातम्या आणखी आहेत...