आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KFC चे चिकन असुरक्षित, सरकारी रिपोर्टचा दावा; आढळले घातक Bacteria

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - अमेरिकन फूड चेन केएफसीच्या पाच आउटलेट्समधून घेण्यात आलेल्या सॅम्पलमध्ये नुकसानदायक साल्मोनेला आणि ई कोलाई बॅक्टेरिया आढळले आहेत. एका सामाजिक संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर तेलंगणाच्या स्टेट फूड लॅब (एसएफएल) मार्फत या टेस्ट करण्यात आल्या. केएफसीने मात्र या चाचण्यांचे अहवाल फेटाळून लावले आहेत. तर सामाजिक संघटनेने केएफसीच्या फूड प्रोडक्ट्सवर त्वरित बंदी लादण्याची मागणी केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार एसएफएलच्या फूड अॅनालिस्ट एव्ही कृष्णा कुमारी यांनी 24 जूनला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ''माझ्या मते सॅम्पल्समध्ये ई कोलाई आणि साल्मोनेला बॅक्टेरिया आहेत. ते आरोग्यासाठी हानिकारक आहेत. सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा राव म्हणाल्या की, आम्ही शहरातील हिमायतनगर, विद्यानगर, चिकटपल्ली, नचरम आणि ईसीआयएल एक्स रोडमधून 18 जूनला सँपल घेतले आणि त्याच दिवशी केएफसीच्या ओरिजनल बॉक्समध्ये सीलबंद पॅकिंगमध्ये चाचणीसाठी पाठवले.

केएफसीने फेटाळला आरोप
केएफसीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, आमच्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याचे कारण म्हणजे हे पदार्थ 170 अंश तापमानावर शिजवले जातात. हा रिपोर्ट खोट्या आरोपांवर आधारित आहे. आम्हाला स्टोअरमधून सँपल घेतल्याची काहीही माहिती नाही. सँपल कोणत्या स्थितीत लॅबमध्ये पाठवण्यात आले हेही आम्हाला माहिती नाही. जे सँपल्स घेतले ते लगेचच खाण्यासाठी असतात आणि लवकर खराब होतात. आम्हाला कोणाकडूनही याबाबत माहिती देण्यात आली नाही, असे केएफसीचे म्हणणे आहे. मात्र एफएसएलच्या फूड अॅनालिस्टच्या रिपोर्टमध्ये सँपल सीलबंद असल्याचा उल्लेख होता, त्याच्या आधारे एनजीओने हा दावा केला आहे.

कारवाई नाही
ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे सेंट्रल झोनचे फूड सेफ्टी ऑफिसर म्हणाले की, त्यांचा विभाग या प्रकरणात काहीही कारवाई करू शकत नाही. कारण सँपल्स एनजीओने घेतले होते. जेव्हा विभाग स्वतः सॅम्पल घेऊन त्याची चाचणी करेल तेव्हाच कारवाई केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...