आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LoC पलिकडे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा देण्याची गरज नाही : मोदी सरकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
28-29 सप्टेंबरच्या रात्री भारताने एलओसी पार कर सर्जिकल स्ट्राइक केले होते. - Divya Marathi
28-29 सप्टेंबरच्या रात्री भारताने एलओसी पार कर सर्जिकल स्ट्राइक केले होते.
नवी दिल्ली - एलओसी पलिकडे करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा कोणताही पुरावा जाहीर केला जाणार नसल्याचे मोदी सराकरने स्पष्ट केले आहे. 28-29 सप्टेंबरच्या रात्री पॅराकमांडोजने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या लाँच पॅड्सला टार्गेट केले होते. या कारवाईत 38 दहशतवादी ठार झाले होते.

भारताची युद्धाची भूमिका नाही...
- इंग्रजी वृत्तपत्र 'द इंडियन एक्सप्रेस' च्या वृत्तानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या भारताचा युद्ध पुकारण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण तसे असले तरी, कोणी आमच्यावर हल्ले करेल आणि आम्ही उत्तरही देणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही.
- हे सर्जिक स्ट्राइक म्हणजे भारताचे डिप्लोमॅटिक यश असल्याचे सांगत, कोणत्याही देशाने भारताच्या कारवाईला विरोध केला नसल्याचे अधिकारी म्हणाले आहेत. अगदी पाकच्या नीकटवर्तीय चीननेही पाठिंबा दर्शवला आहे. तर मुस्लीम देशांनीही भारताचे कौतुकच केले आहे.
- मिलिट्री ऑपरेशन्सशी संबंधित अधिकारी म्हणाले की, सप्टेंबरमध्ये यूएन जनरल असेंबलीच्या मीटिंगमध्ये भारताने दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्यासाठी प्रयत्न केला होता.
काय म्हणाले अधिकारी..
- 'रिपब्लिक डे ला चीफ गेस्ट अबू धाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यां हे असतील. याचा निर्णयही सर्जिकल स्ट्राइकनंतरच घेण्यात आला. हाही सरकारच्या डिप्लोमॅटिक स्ट्रॅटर्जीचा एक भाग आहे.
- अधिकाऱ्यांच्या मते, अमेरिकेला अजूनही सर्जिकल स्ट्राइकची माहिती देण्यात आलेली नव्हती.
- एनएसए अजित डोभाल आणि अमेरिकेच्या एनएसए सुसैन राइस यांच्या टेलिफोनवर कोणत्याही मिलिट्री ऑपरेशनबाबत चर्चा झाली नाही. एवढेच काय पण, डोभाल यांनी सुसैन यांना भारत असे काही करणार असल्याची हिंटही दिली नव्हती.
- सुत्रांच्या मते भारताला अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाला स्ट्रॅटर्जी सांगायची गरज नाही. अगदी नेहरूंच्या काळापासून हेच चालत आले आहे.
- गेल्या अनेक वर्षांपासून आपण जगातील अनेक देशांबरोबर काम करत आहोत. पण तरीही भारताला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
- 'सर्जिकल स्ट्राइकमधून जी सर्वात मोठी बाब समोर आली ती म्हणजे, निर्णय घेण्याची क्षमता भारताने मिळवली आहे.

पुढे वाचा, पाक तणावात..
बातम्या आणखी आहेत...