आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चेन्नईतील ऑटोरिक्षामध्ये जीपीएस यंत्रणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - ऑटोरिक्षामधील प्रवाशांना सुरक्षितता मिळावी म्हणून चेन्नईत ऑटोमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामध्ये एक पॅनिक बटण आहे. त्यामुळे काही क्षणात प्रशासनाला धोक्याची कल्पना येणार आहे.


मुख्यमंत्री जयललिता यांनी हे जाहीर केले आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर कोट्यवधींचा बोजा पडणार आहे. चेन्नईत 71 हजारांहून अधिक ऑटो आहेत. जीपीएसबरोबरच ऑटोमध्ये इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्रिंटरदेखील बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकृत पावतीदेखील मिळणार आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळी ऑटोकडून तिकिटाची रक्कम अडवून मागितली जाते. त्याला चाप बसणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, असे जयललिता म्हणाल्या.