आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gram Panchayats To Get Own Building And Modern Facilities

ग्रामपंचायतींना मिळणार हक्काची इमारत, आधुनिक सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकाकुलम - देशातील 2 लाख 48 हजार ग्रामपंचायतींना राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत (आरजीपीएसए) स्वत:च्या इमारती आणि कर्मचारी देण्यात येणार आहेत. केंद्रीय पंचायत राज आणि आदिवासी विकास मंत्री व्ही. किशोरचंद्र सूर्यनारायण देव यांनी ही माहिती दिली.

राजीव गांधी ग्राम सशक्तीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना पायाभूत सोयी-सुविधा देण्यासाठी 650 कोटी रुपये खर्चून ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारती, सचिव, कॉम्प्युटर ऑपरेटरसह अन्य कर्मचारी दिले जाणार आहेत. ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांचा 70 टक्के पगार केंद्र सरकार करते. देशातील 45,000 ग्राम परिषदांना ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सर्व ग्रामपंचायतींनाही ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

देशातील मागास प्रदेशांचा विकास करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्याअंतर्गत एकीकृत विकास योजनेअंतर्गत दरवर्षी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सितमपेठा खेड्यात शीतगृहाच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

विमा कंपन्यांनो, खेड्यांकडे चला: चिदंबरम
भारत हा जगातील विमाकवच नसलेला सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून देशातील खेडी आणि लहान शहरांवर लक्ष केंद्रित करून तेथे विम्याबाबत जागृती करा, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. आपल्या देशात विम्याबाबत फारच कमी जागृती आहे. जीवन विमा प्रसाराबाबत भारताचा जगात 52 वा क्रमांक लागतो. श्रीलंका, मलेशियापेक्षाही आपले रँकिंग कमी आहे. ब्राझील, चीन आणि रशिया या आपल्या ब्रिक्स सहकारी राष्ट्रांच्या तुलनेत आपली अवस्था अत्यंत वाईट आहे, असे चिदंबरम म्हणाले. अखिल भारतीय विमा जागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.