आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयप्रकाश नारायण यांच्या स्वप्नातील ग्रामसभा आजही बिहारमध्ये कार्यरत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरपूर- चंपारण आंदोलनाच्या शताब्दी वर्षात गाव,पंचायत आणि ग्रामसभांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. अशा एकुण ५६ ग्रामसभा बिहारमध्ये असून त्या स्वबळावर गावातील लोकांना मदत करत आहेत. या  लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्वप्नातील ग्रामसभा आहेत. जून १९७० मध्ये मुझफ्फरपूरच्या मुशहरी गावात जयप्रकाश नारायण यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात स्थापन झालेल्या सात ग्रामसभापैकी मादापरू चौबे ग्रामसभा आजही सक्रिय आहे. शहरापासून ५ किमी पश्चिमेस असलेल्या नियोजित बायपासच्या बाजूला मादापूर चौबे ग्रामसभा आहे. या ग्रामसभेचे संस्थापक जगन्नाथ पांडे यांनी सांगितले, पंचायत राज व्यवस्थेपेक्षा वेगळे कार्य करत असताना, लोकांना स्वस्त दरात धान्य व इतर सामान उपलब्ध करून देण्यात येत आहे. गरिब आणि आजारी लोकांना ग्रामसभा आर्थिक मदत करते.

जेपींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामसभांनपा पंचायत राज व्यवस्थेनुसार कामकाजी अधिकार देण्यासाठी ते कायदेशीर लढाई लढत आहेत. पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ग्राम दान कायद्यानुसार सर्व ग्रामसभांना कायदेशीर अधिकार मिळावेत अशी मागणी आहे. 

१९६९ मध्ये मादापूर चौबे झाले ग्रामदानी गाव
बिहार ग्राम दान अॅक्ट १९५६ नुसार जिल्ह्यातील ८५ गावांना ग्रामदानी गावत जाहीर करण्यात आले.  १९६९ मध्ये ग्रामदान अधिकाऱ्यांनी मादापूर चौबेला ग्रामदानी गावाचा दर्जा दिला.  गावातील ७५ टक्के लोक ग्रामसभेचे सदस्य होते. यात ५१ टक्के लोक भूधारक होते.

ग्रामसभेत वाद सोडवले जातात, लोकांना किरायाने साहित्य
ग्रामसभेचे न्यायमित्र लक्ष्मण पांडे यांनी सांगितले,आम्ही सर्वजण ग्रामसभा चालवतो. गावातील बहुतांश वाद ग्रामसभेत सोडवले जातात. लोकांना स्वस्त दराने काही साहित्य भाड्याने दिले जाते. याचा दर प्रतिदिन १० रुपये इतका असतो. लहान समारंभासाठी लागणारे साहित्य येथे मिळते. ग्रामसभेच्या कार्यकारिणींची दर दाेनवर्षांनी निवडणूक होते. निवडणुकीच्या सभेत सदस्यांचे नाव पुकारले जाते. सर्वजण हात उंचावून त्या नावास संमती देतात.
बातम्या आणखी आहेत...