आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grand Mother, All Children Twins, Celebrate Birthday On 25 June

योगायोग : आजी, आई, अपत्ये सर्वच जुळी, जन्मदिवसही २५ जून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - जुळी अपत्ये हे काही आश्चर्य नाही. प्रत्येक शहरात, वसाहतींत अशी कुटुंबे आढळतातच. मात्र बुढापारा येथे स्थायिक सुराणा कुटुंबात विलक्षण योगायोग दिसून आला. गेल्या महिन्यात २५ जून रोजी या कुटुंबात जुळे जन्माला आले. यांच्या अागमनाने पूर्ण कुटुंबाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. कारण या जुळ्यांच्या आईचा जन्मदिवसही २५ जून आणि तीसुद्धा जुळ्यातीलच एक. इतकेच काय नवजात मुलांची आजी (आईची आई) देखील जुळ्यातीलच आणि आजीचा जन्मदिवसही २५ जूनच. हा विलक्षण योगायोगच या कुटुंबाने अनुभवला.
कुटुंबाच्या नातलग व मित्र परिवारानेही यावर आश्चर्य व्यक्त केले. जुळ्यांची आई श्रुती सुराणा जुळ्यातीलच. श्रवण कोचर हे त्यांचे जुळे बंधू. श्रुतीची आई आशा कोचर व त्यांची बहीण उषा कटारिया जुळ्या बहिणी. उषा या महाराष्ट्रातील वणी येथे स्थायिक आहेत. आश्चर्य म्हणजे श्रुती यांच्या बहिणीची मुलगी कांची बरलोटा हिचा जन्मही २५ जूनचा आहे.
पुढे वाचा... एकाच तारखेला जन्मलेल्या तीन पिढ्यांविषयी