आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Great Grandson Of Subhash Chandra Bose Likely To Join BJP Soon

निवडणुकीच्या तोंडावर नेताजींचे पणतू चंद्र बोस यांचा भाजपमध्ये प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमित शहांच्या उपस्थितीत चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. - Divya Marathi
अमित शहांच्या उपस्थितीत चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कोलकाता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र बोस यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भाजप ही एक नॅशनल पार्टी आहे आणि पक्षासोबत काम करून आनंद होईल, असे ते म्हणाले.

शहा यांच्याशी सिक्रेट मिटींग...
- चंद्र बोस यांची सोमवारी दुपारी हावडा येथील गेस्ट हाऊसवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर सिक्रेट मिटींग झाली.
- या मिटींगमध्ये चंद्र यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.
- शाह यांची सोमवारी हावडामध्ये महत्त्वाची रॅली आहे. या रॅलीमध्ये चंद्र भाजपमध्ये सहभागी होतील. भाजपने मात्र याबाबत अद्याप काहीही अधिकृतरित्या सांगितलेले नाही.

भाजपसाठी खास ठरू शकतात चंद्र बोस
- चंद्र यांची नेताजींच्या फायली सार्वजनिक करण्यामागे महत्त्वाची भूमिका आहे.
- त्यांना नरेंद्र मोदींचे नीकटवर्तीय म्हणूनही ओळखले जाते.
- पश्चिम बंगालमध्ये भाजपकडेही राज्य स्तरावर मोठा चेहरा नाही. त्यामुळे चंद्र बोस पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
- मोदींनी शनिवारीच नेताजींशी संबंधित 100 फायली सार्वजनिक केल्या होत्या. त्यावेळी चंद्र बोसही उपस्थित होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS