आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता मोहन गोखलेंच्या अभिनयाला तोड नव्हती - कमल हसन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांच्या दिग्दर्शनाखालील ‘हे राम’ चित्रपटाच्या निर्मितीस १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने कमल हसन यांनी दिवंगत अभिनेता मोहन गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या अभिनयाला तोड नव्हती; परंतु दुर्दैवाने चित्रीकरणादरम्यान त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी अतुल कुलकर्णी यांना ती व्यक्तिरेखा देण्यात आली.

‘हे राम’ला शुक्रवारी १६ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने चाहत्यांनी जणू उत्सव साजरा केला. दिग्दर्शनाखाली हा प्रकल्प केवळ शाहरुख खान आणि भरत शहा यांच्यामुळे पूर्ण होऊ शकला; परंतु या प्रसंगी मला सर्वाधिक स्मरण होते ते मोहन गोखले यांचे. चित्रीकरणादरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना देण्यात आलेली श्रीराम अभ्यंकर नावाची व्यक्तिरेखा त्यांनी जिवंत केली होती. माझ्या अपेक्षेपलीकडे जाऊन त्यांनी त्यात प्राण आेतले होते. त्यांच्यावरील ९० टक्के चित्रीकरणही पूर्ण झाले होते. एकेदिवशी चित्रीकरणाचा आढावा घेण्याचे ठरवले. सगळे युनिट तेथे जमले होते. त्यांचा अभिनय उठावदार आणि हृदयस्पर्शी होता. तुम्हाला या भूमिकेसाठी पुरस्कार हमखास मिळणार बरं का, असे मी त्यांना म्हटलो होतो; परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले.

अनेकांचे योगदान
अभिनेत्री राणी मुखर्जी, हेमा मालिनी, अब्बास, गिरीश कर्नाड, वसुंधरा दास, नसिरुद्दीन शहा अशी तगडी स्टारकास्ट ‘हे राम’मध्ये होती. त्यांच्या योगदानाचा उल्लेख कमल हसनने चित्रपटाच्या निर्मितीच्या आठवणींना उजाळा देताना आवर्जून केला. त्यात फाळणीनंतरचा दाहक इतिहास दाखवण्यात आला आहे.