आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Great Tribute To Bhagatsingh Through Dram In Pakistan

पाकिस्तानातील भगतसिंगांच्या गावी नाटकाद्वारे अर्पण केली श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - फाळणीनंतर प्रथमच पाकिस्तानात शहीद-ए-आझम भगतसिंग यांना त्यांच्याच गावात त्यांच्या जीवनावर आधारित नाटकाद्वारेश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘मेरा रंग दे बसंती चोला’ नावाचे हे नाटक फैसलाबाद जिल्ह्यातील बंगा या भगतसिंगांच्या मूळ गावी सादर करण्यात आले.

लाहोरच्या अजोका थिएटरच्या कलाकारांनी हे नाटक सादर केले. तर, प्रसिद्ध रंगकर्मी महिदा गोहर यांनी दिग्दर्शन केले. हे नाटक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, असे गोहर यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. या नाटकाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते, असे त्या म्हणाल्या. चाहत्यांनी नाटकाची स्तुती करण्याबरोबरच भगतसिंगांच्या जीवनातील संघर्षाची माहिती देण्याबद्दल अजोकाच्या टीमचे अभिनंदनही केले. नाटकाची सुरुवात 1974 मधील एका नवाब मोहंमद अहमद खान नामक व्यक्तीच्या खून प्रकरणाच्या तपासाने होते. तपास करणारे पोलिस अधिकारी जेव्हा लाहोर सेंट्रलला पोहोचतात तेव्हा त्यांना पाहिजे असलेल्या व्यक्ती आणि भगतसिंग यांच्यात साम्य जाणवते. त्यानंतर बाबा मोगा नावाचे पात्र गोष्ट पुढे नेते. हा तुरुंगातील स्वच्छता कर्मचारी होता आणि भगतसिंग यांच्याबरोबर त्याची चांगली मैत्री झाली होती. भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्‍यांबद्दलच्या स्तुतिगीतांनी नाटकाची कथा पुढे सरकते, असे लेखक शाहिद नदीम यांनी सांगितले.