श्रीनगर- दहशतवाद्यांनी शनिवारी अनंतनाग जिल्ह्यातील अछाबल बस परिसरात सकाळी सीआरपीए दलाच्या तळाला लक्ष्य करताना ग्रेनेड हल्ला केला. परंतु दहशथवाद्यांचा निशाणा हुकला आणि ग्रेनेडचा स्फोट गर्दीत झाला. त्यात मोहंमद जबार येथील एका नागरिकांचा मृत्यू झाला. घटनेत एका जवानासह पाच जण जखमी झाले. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव टाकून तपास करण्यात आला. काश्मीरमध्ये दोन दिवसांतील हा चौथा ग्रेनेड हल्ला आहे. शुक्रवारी मोबाइल कंपनीवर तीन हल्ले झाले होते. दुसरीकडे शोपिया जिल्ह्यातील जंगलात तीन दहशतवादी दडून बसल्याची माहिती शनिवारी मिळाल्यानंतर पोलिस-लष्कराची तुकडे तेथे दाखल झाली. त्यावेळी चकमक होऊन दहशतवाद्यांनी तेथून पलायन केले. रात्री उशिरापर्यंत परिसराला घेराव घालण्यात आला होता.